'अनेकजण हे भूमिकेत बदल करुन सत्तेत आलेत,' राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला 

औरंगाबाद
रोहित गोळे
Updated Feb 14, 2020 | 12:03 IST

Raj Thackeray Mns: आतापर्यंत अनेकांनी भूमिका बदलून सत्ता स्वीकाराली असल्याचं आपण पाहिलं आहे. असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

mns chief raj thackeray criticized to shivsena in aurangabad  
'अनेकजण हे भूमिकेत बदल करुन सत्तेत आलेत,' राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकेर हे सध्या मराठावाड्याच्या दौऱ्यावर असून आज (शुक्रवार) त्यांनी पत्रकारांनी अनौपचारिक गप्पा मारला. त्यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पण यावेळी ते असं म्हणाले की, 'अनेकजण भूमिकेत बदल करुन सत्तेत आले आहेत.' त्यामुळे राज ठाकरे यांनी हा टोल शिवसेनेला लगावला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, मनसेने आपला झेंडा बदल्यामुळे आपली भूमिका देखील बदलली आहे. अशी सध्या चर्चा सुरु आहे. याबाबतच्या प्रश्नांना देखील त्यांनी उत्तर दिलं. 

'खरं तर झेंडाच्या विषय हा काही आताचा नाही. जवळजवळ ४ वर्षापूर्वीच हा झेंडा असावा अशी पक्षात चर्चा झाली होती. त्यामुळे हा काही फक्त स्पेस भरुन काढण्यासाठी घेतलेला विषय नाही. तसंच झेंड्याबाबत आम्हाला कोणतीही नोटीस आलेली नाही. जर आपण म्हणत असाल की, झेंडा बदलला म्हणून भूमिका बदलली. तर ते बरोबर नाही. माझी सुरुवातीपासूनच हिंदुत्वाची भूमिका होती. तसंही आजवर अनेकजण हे भूमिकेत बदल करुन सत्तेत आले आहेत.' असं म्हणत राज ठाकरें यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.  

'मशिदींवरील भोंगे बंद झाले पाहिजे'

'जर धर्माला कोणी हात लावला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन. माझी हिंदुत्वाची भूमिका सुरुवातीपासूनच होती. जेव्हा मुंबईत रझा अकादमीने पोलिसांवर हल्ला केला त्यानंतर त्यांचा निषेध करण्यासाठी सर्वात आधी आम्हीच मोर्चा काढला. मशिदींवरील भोंगे बंद झाले पाहिजे ही मागणी मी नेहमी करत आलो आहे. त्यामुळे माझ्या भूमिकेत काहीही बदल झालेला नाही.' असं म्हणत राज ठाकरे यांनी यापुढेही हिंदुत्वाची भूमिका घेऊनच पुढे जाणार असल्याचं म्हटलं आहे. 

औरंगाबादच्या नामांतराची मागणी

दरम्यान, याचवेळी औरंगाबादचं नाव बदललं पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले. 'औरंगाबादचं नाव बदललं तर काय हरकत आहे? चांगले बदल झालेच पाहिजेत. संभाजीनगर नाव झाल्यास योग्यच.' असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराची देखील मागणी केली आहे. 

'मनसेची सुरुवातीपासूनच घुसखोरांविरुद्ध भूमिका राहिली आहे. आजवर ज्या भूमिका कोणी घेतल्या नव्हत्या त्या भूमिका मी घेतल्या आहेत.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी