Raj Thackeray Aurangabad Rally : 1 मे च्या सभेचा मनसेकडून टीझर प्रदर्शित, पण औरंगाबादेत जमावबंदी लागू

औरंगाबाद
भरत जाधव
Updated Apr 26, 2022 | 10:16 IST

मनसेकडून  (MNS ) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेचा टीझर(Teaser) प्रदर्शित करण्यात आला आहे. ही सभा 1 मेला होणार असून या सभेच्या टीझरमध्ये संभाजीनगर (Sambhajinagar), असा उल्लेख करण्यात आला आहे. या सभेतून राज ठाकरे कोणा-कोणावर हल्लाबोल करणार याचा कवायस लावला जात होता.

curfew imposed in Aurangabad
राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रदर्शित होताच औरंगाबादेत जमावबंदी लागू  
थोडं पण कामाचं
 • औरंगाबाद शहरात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू
 • मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेचा टीझर प्रदर्शित

औरंगाबाद : मनसेकडून  (MNS ) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेचा टीझर(Teaser) प्रदर्शित करण्यात आला आहे. ही सभा 1 मेला होणार असून या सभेच्या टीझरमध्ये संभाजीनगर (Sambhajinagar), असा उल्लेख करण्यात आला आहे. या सभेतून राज ठाकरे कोणा-कोणावर हल्लाबोल करणार याचा कवायस लावला जात होता. परंतु मनसेला सभेपूर्वी जबरदस्त धक्का मिळाला आहे. औरंगाबाद (Aurangabad ) पोलिसांनी एक पत्रक काढत प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार की नाही हे पाहावे लागेल.

औरंगाबाद शहरात जमावबंदी आणि शस्त्रबंदी

औरंगाबाद शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या 37 (1) आणि (3) कलमान्वये जिल्ह्याच्या शहरी हद्दीत दिनांक 9 मे 2022 पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

काय आहेत पोलिसांचे आदेश?

औरंगाबाद पोलिसांनी एक पत्रक काढलं आहे, त्यात म्हटल्याप्रमाणे, औरंगाबाद आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात विविध राजकीय पक्ष तसेच संघटनांतर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांच्या तसेच इतर विषयांच्या संदर्भात काही कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सध्या राज्यात मनसे पक्षाच्या वतीने आगामी काळात मंदीर / मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून त्याला विविध राजकीय पक्ष, संघटना यांचा विरोध असून त्यांच्याकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.

 • मराठा आरक्षण / ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निकालाने मराठा / ओबीसी समाजात असंतोष असून त्या अनुषंगाने विविध राजकीय संघटना, पक्षांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
 • मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध सामाजिक, राजकीय पक्ष, संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
 • कर्नाटकात चालू असलेल्या हिजाब मुद्द्यावरुन शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
 • इंधन दरवाढी विरोधात शासनाविरुद्ध विविध राजकीय पक्ष / संघटनांक़डून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
 • औरंगाबाद शहर हे संवेदनशील असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे जरुरी वाटते.

औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा त्याचे जवळपास कोणत्याही व्यक्तीस खाली नमूद गोष्टी करता येणार नाहीत.

 • शस्त्रे, लोटा, तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही.
 • कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाही.
 • दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा पेकावयाची साधने बाळगू नये, जमा करु नये किंवा तयार करता येणार नाही.
 • कोणत्याही व्यक्तिची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करता येणार नाही.
 • जाहीरपणे घोषणा करू नये, गाणे किंवा त्यांचे ध्वनीमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनीक्षेपण करु नये.

दरम्यान, ठाण्याच्या उत्तर सभेमध्ये मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची घोषणा करणारे आणि पुण्यामध्ये हनुमानाची महाआरती करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता औरंगाबादच्या सभेत कोणती नवी घोषणा करणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. परंतु टीझरवरुन अनेकजण हा कवयास लावत आहेत आहेत. जर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली तर ते औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित करू शकतात. 

अनेक संघटनांचा मनसेच्या सभेला विरोध

एकीकडे मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी सुरु केली असताना दुसरीकडे विरोध केला जात आहे. सध्याची परिस्थिती, रमाजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा असे विविध विषय उपस्थित करत अनेक संघटना दररोज पोलीस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदनं देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी