मनसेने केली कृषी विभागाच्या कार्यालयाची तोडफोड

औरंगाबाद
Updated Jul 14, 2020 | 22:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

MNS vandalizes agriculture department office: महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने लातूर येथील कृषी विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. बोगस बियाण्यांच्या कंपनीवर कारवाई करून शेतकर्यांना

MNS vandalizes agriculture department office
मनसेने केली कृषी विभागाच्या कार्यालयाची तोडफोड   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • बोगस बियाण्यांमुळे सध्या शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
  • महारष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला राडा
  • थोड्या थोडक्याच कंपन्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत चालला आहे.

लातूर-  बोगस बियाण्यांमुळे सध्या शेतकरी (farmer) पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी जवळ असलेला पैसा खरिप हंगामाच्या (Kharif season) पेरणीत गुंतवला मात्र बियाणेच बोगस असल्याने ते उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांची अडचणीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठीचा लागणारा खर्च याच बोगस बियाण्यांच्या (bogus seeds) कंपनीकडून (company) वसूल करून शेतकऱ्यांना द्यावा यासाठी महारष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे (manse) प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी कृषी संचालक कार्यालयात तुफान राडा केला आहे.

कृषी विभागाकडे हजारो तक्रारी प्राप्त

संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी बोगस बियाणे निघाल्याच्या अनेक तक्रारी शासन दरबारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र थोड्या थोडक्याच कंपन्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत चालला आहे. लातूर जिल्ह्यात देखील सोयाबीन पिकाचे बियाणे वांजट निघाल्याच्या हजारो तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. सोयाबीन पिकाचे बियाणे बोगस असून, ते पेरल्यानंतर उगवलेच नाही. त्यामुळे आता आमच्याकडे पुन्हा दुबार पेरणी करण्यासाठी आमच्याकडे पैसे नसून, आम्हाला शासनाने मदत करावी अस शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हजारो शेतकऱ्यांचा पेरणीचा प्रश्न कायम

बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. हजारो शेतकऱ्यांच्या पेरणीचा प्रश्न हा कायम असून, शेतकऱ्यांवर आलेल्या या अडचणीवर मात करून शेतकऱ्याना त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शेतकरी संघटना पुढे आल्या आहेत. अनेक आन्दोलन होऊन देखील मोबदला मिळत नसल्याने, लातुरात उद्रेक पहायला मिळाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याकडून मंगळवारी चक्क लातूर येथील कृषी विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विविध बोगस कंपन्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून, शेतकर्यांना दुबार पेरणीसाठी कंपन्यांकडून खर्च वसूल करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून द्यावी या मागणीसाठी मनसेने कृषी कार्यालयात राडा केला आहे.

औरंगाबादेत मोठ्या कंपन्यासह ४६ विविध कंपन्यावर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांची खरीप हंगामातील मेहनत मातींत मिसळणाऱ्या ४६ विविध बियाण्यांच्या कंपन्यांना औरंगाबाद खंडपिटाने चांगलाच दणका दिला आहे. दरम्यान काही मोठ्या कंपन्यासह ४६ कंपन्यावर गुन्हा दाखल केला असून, ५३ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, बोगस कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जवळपास ४९ पेक्षा जास्त तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. यावर न्यायालयाने शेतकऱ्यांची दाखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती.दरम्यान याचिकेच्या सुनावणी दरम्यान कृषी विभागाकडून गांभीर्य दाखवण्यात आले नसल्यामुळे न्यायालयाने स्वतः कृषी सह संचालकांना न्यायालयात हजार राहण्याकॅहे आदेश दिले होते.

बोगस बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले

शेतकऱ्यांची दखल न्यायालयाने घेतली असून,बोगस बियाणे प्रकरणी कडक कारवाईचे पाउल उचलल्यानंतर बोगस बियाणे विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी