एमआयएम खासदार इम्तियाज जलीलांवर पुन्हा पैशांची उधळण, पहा व्हिडिओ

Money squandered again on MIM MP Imtiaz Jalil ; शुक्रवारी आमखास मैदानावर जलील यांच्याकडून कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कव्वाली सुरू होताच जलील यांच्या समर्थकांकडून जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडताना पाहायला मिळाले.

Money squandered again on MIM MP Imtiaz Jalil
एमआयएम खासदार इम्तियाज जलीलांवर पुन्हा पैशांची उधळण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आमखास मैदानावर जलील यांच्याकडून कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता
  • या कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर पैशाची उधळण करण्यात आली
  • यापूर्वीही जलील यांच्यावर उडवण्यात आले होते पैसे 

औरंगाबाद :  कव्वालीच्या कार्यक्रमात एमआयएम पक्षाचे ( MIM MP) खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पडतानाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. औरंगाबाद येथील आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर नोटांचा पाऊस पडत होता. यापूर्वी देखील जलील यांच्यावर अशाच प्रकारे कार्यकर्त्यांनी पैशाचा पाऊस पाडला होता. यापूर्वी खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसमारंभात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही जलील यांच्यावर नोटा उधळल्या होत्या. त्याचा देखील व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

अधिक वाचा ; Rip Twitter: मस्कला झालंय तर काय? शेअर केली ट्विटरची कबर

आमखास मैदानावर जलील यांच्याकडून कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आमखास मैदानावर जलील यांच्याकडून कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कव्वाली सुरू होताच जलील यांच्या समर्थकांकडून जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडताना पाहायला मिळाले. खासदार जलील यांच्याकडून आमखास मैदानावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जात आहे.

विशेष म्हणजे या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण येऊन भेट देऊन जात आहे. आणि याच मैदानावर जलील यांच्यावर पैशाची उधळण करण्यात आल्याने हा विषय जिल्हाभरात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमणात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर न जाणारे जलील यांच्यावर अशा प्रकारे पैसे उधळताना बघून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

अधिक वाचा ; आदित्य ठाकरे बालिश..., नारायण राणे यांची बोचरी टीका 

यापूर्वीही जलील यांच्यावर उडवण्यात आले होते पैसे 

खुलताबाद येथे आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमात देखील जलील यांच्यावर अशाच प्रकारे पैसे उधळले गेले होते. त्याचबरोबर, एमआयएमचे तत्कालीन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे डिसेंबर 2021 मध्ये  लग्न होते.औरंगाबाद शहरातील एका प्रसिद्ध लॉन्समध्ये हे लग्न झालं होतं. यावेळी कव्वालीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी जलील नरवदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर जाताच त्यांच्यावर नोटांचा वर्षाव करण्यात आला होता. यावेळी देखील जलील यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

अधिक वाचा ; इलॉन मस्क बोलतच राहिले आणि कर्मचाऱ्यांनी सोडल्या नोकऱ्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी