जालन्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना, आईची चार लेकरांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, अशी घडली संपूर्ण घटना

mother and 4 children commits suicide in jalna : एका विवाहितेने कौटूंबिक वादातून पोटच्या चार लेकरांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड (Jalna Ambad Suicide case) तालुक्यातील घुंगर्डे हादगाव या गावात सदर घटना घडली

mother and 4 children commits suicide in jalna
आईची चार लेकरांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गणेश फिस्के यांच्या शेतातील विहिरीत या पाचही जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले
  • गंगासागर यांनी मुलामुलीसह सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शेतातच वेळ घालवला
  • एका विवाहितेने कौटूंबिक वादातून पोटच्या चार लेकरांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

जालना : प्रत्येकांच्या घरात काही न काही कारणावरून वाद होत असतात. मात्र, हे वाद लवकर मिटले नाहीत तर याचा परिणाम देखील वाईट होतो, हे आपण अनेकांनी पाहिलं ऐकल किंवा अनुभवले देखील असेल. दरम्यान, अशीच एक घटना घटना जालना जिल्ह्यातून समोर आली आहे. एका विवाहितेने कौटूंबिक वादातून पोटच्या चार लेकरांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड (Jalna Ambad Suicide case) तालुक्यातील घुंगर्डे हादगाव या गावात सदर घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल म्हणजेच ३० डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास गंगासागर या तीन मुली आणि एका मुलासह शेतात चक्कर मारायलाचा बहाणा करुन गेल्या होत्या. दरम्यान, त्या शेतात जात असताना गावतील अनेक मंडळींनी त्यांना पहिले होते. दरम्यान, अंबड तालुक्यातील घुंगर्ड हादगाव गावातील ज्ञानेश्वर प्रल्हाद अडाणी हे पत्नी गंगासागर अडाणी व तीन मुली आणि एक मुलासह गावात राहतात.

गंगासागर यांनी मुलामुलीसह सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शेतातच वेळ घालवला

गंगासागर यांनी आपली लेकरांसोबत पूर्ण दिवस हा त्यांनी शेतात घालवला. त्या सायंकाळी ५ वाजून ३० मिनीटांपर्यंत शेतातच होत्या. मात्र, त्या घरी आल्या नाहीत या सर्वांची वाट पाहत त्यांचे कुटुंबीय बसले होते. परंतु रात्री सात वाजेपर्यंतही गंगासागर व मुलं, मुली घरी परतले नसल्याने ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध सुरु केली. परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला मात्र त्या आढळून आल्या नाहीत.  

गणेश फिस्के यांच्या शेतातील विहिरीत या पाचही जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले

कुटुंबीयांनी या सर्वान रात्री उशिरापर्यंत शोधले मात्र रात्री कोणीही आढळून आले नाही. गावकरी व अडाणी कुटुंबातील सदस्य यांनी ही आजूबाजूच्या शेतात व विहिरी पिंजून काढल्या. त्यानंतर रात्रभर  शोध घेऊनही त्यांचा काही शोध लागला नाही. या सर्वांचा शोध सुरु आसतानाच सकाळीच काहींच्या नजरेत अडाणी यांच्या शेताशेजारील गणेश फिस्के यांच्या शेतातील विहिरीत या पाचही जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. गंगासागर अडाणी यांनी आपल्या चार मुलांसह विहिरीत उड्या घेत आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. 

अशी आहेत आत्महत्या करणाऱ्यांची नावे?

गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी (३२), भक्ती (१३), ईश्वरी(११), अक्षरा(९) व मुलगा युवराज (७) अशी मृतांची नावं आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी