लातूर : राग मनुष्याचा शत्रू ्असतो असं म्हटलं जातं आणि ते खरं ही आहे. रागामुळे आपण आपला आणि आपल्या जवळील व्यक्तीचं नुकसान करत असतो. रजनीकांतलाही हाच अनुभव आला. परंतु त्याच्या रागामुळे तो सासू आणि मुलाचा मारेकरी बनला आणि नंतर त्याला आपला जीव गमवाला. बायको आणि मुलं सोडून गेल्याचा राग रजनीकांतला अनावर झाला आणि त्याने हातात आलेल्या कोयत्यानं आपल्या पोटच्या पोरावर आणि सासूवर हल्ला चढवला. त्यानंतर रागाच्या भरात रजनीकांतने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. ही घटना लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीर हनुमंत वाडी भागामध्ये घडली. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवली यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
रजनीकांतच्या कोयत्याने केलेल्या हल्लामुळे सात वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीर हनुमंत वाडी भागामध्ये काल रात्री थरारक घटना घडली आहे. सदर घटनेने जिल्हाभरात मोठी खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा ; या 1 रुपयाच्या शेअरने बनवले करोडपती, 1 लाखाचे झाले 7.32 कोटी
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव रजनीकांत वेदपाठक असं आहे. रजनीकांत हा उदगीर येथील रहिवासी आहे. रजनीकांत वेदपाठक याचं लग्न काही वर्षांपूर्वी झालं होतं. मात्र, त्याचे आणि बायकोचे पटत नव्हते. यामुळे दोघात सतत भांडणे असायची. तो बायकोला सतत मारहाण देखील करायचा. या भांडणाला कंटाळून रजनीकांतच्या वडिलांनी सून आणि नातवंड यांना सुनेच्या माहेरी लातूरला पाठवलं होतं. त्यामुळे, तो खूप निराश होता. दरम्यान, त्याने रागाच्या भरात एक कोयता घेतला आणि थेट आपल्या सासरवाडीला म्हणजेच लातूर जवळील वीर हनुमंत वाडी येथे गेला.
रजनीकांत हा प्रचंड रागात होता. सासरवाडीला जाताच त्याला आपला समोर मुलगा दिसला आणि त्याने थेट मुलावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यानंतर मुलगा बाहेर पळत गेला. घरात जाऊन त्याने सासू चंद्रसेना संजयकुमार वेदपाठक यांच्यावर देखील कोयत्याने अनेक वार केले, या जीवघेण्या हल्ल्यात सासू चंद्रसेनाचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर त्याने नंतर घरातील गॅस चालू करून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली.
अधिक वाचा ; पुणे: संशयित दहशतवाद्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड
दरम्यान, रजनीकांत हा उदगीरवरून घरातील सर्वांची हत्या करण्याच्या उद्देशानेच आला होता. त्याने आपल्या मुलावर आणि सासूवर वार देखील केले. या घटनेत सासूचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना घडत असताना घटनास्थळी रजनीकांतची बायको आणि मुलगी घरात नसल्यामुळे ते थोडक्यात बचावले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते.
अधिक वाचा : आजचे राशीभविष्य; जाणून घ्या आजचा बुधवार तुमच्यासाठी कसा