मराठा क्रांती मोर्च्याचं ठरलं, 'या' तारखेला वाजणार आमदार-खासदारांच्या घरासमोर ढोल

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Sep 30, 2020 | 08:59 IST

Movement by playing drums in front of MLAs' houses: उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांच्या घरासमोर दि. २ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करून आंदोलनाची सुरवात होणार असल्याची माहिती दमराठा मोर्च्याने दिली आहे.

 'या' तारखेला वाजणार आमदार - खासदारांच्या घरासमोर ढोल
मराठा क्रांती मोर्चा आंदोलन  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आंदोलनासाठी लवकरच उस्मानाबाद जिल्ह्यात तालुकास्तरीय समन्वयक यांची निवड करण्यात येणार 
  • ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
  • मास्क लावून आणि सोशल डिस्टंसीग चे पालन करून

उस्मानाबाद: सुप्रीम कोर्टाने (suprime court) मराठा समाजाच्या आरक्षणाला (maratha reservation) स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजाकडून (maratha samaj) मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान मराठा आरक्षणावरून  राज्यातील मराठा समाज पुन्हा आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी आंदोलनाचे (protest) हत्यार उपसलेल्या मराठा समाजाने आता राज्यस्तरीय बैठकीमध्ये (maratha reservation state lavel meeting) घेण्यात आलेल्या निर्णयानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांच्या घरासमोर दि. २ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करून आंदोलनाची सुरवात होणार असल्याची माहितीची मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने देण्यात आली आहे. (Movement by playing drums in front of MLAs' houses)

आंदोलनासाठी लवकरच उस्मानाबाद जिल्ह्यात तालुकास्तरीय समन्वयक यांची निवड करण्यात येणार 

दरम्यान काल नाशिक येथे छत्रपती संभाजीराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षेखाली मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीमध्येही मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली आहे. त्यामुळे आता उस्मानाबाद जिल्ह्यातही होणारे आंदोलनराज्यस्तरीय बैठकितील धोरणाप्रमाणे होणार आहेत. त्या नुसार आता २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील खासदार व आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सदर आंदोलनासाठी लवकरच उस्मानाबाद जिल्ह्यात तालुकास्तरीय समन्वयक यांची निवड करण्यात येणार आहे

५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

तसेच ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, याच बरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत मराठा क्रांती मोर्च्याने अधिकृत रित्या दिलेले निवेदन जिल्हाधिकारी व शासनाला देण्यात येणार आहे.

मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून

दरम्यान आंदोलन होत असताना "माझे कुटूंब माझी जबाबदारी" या प्रमाणे सोशल नियमावलीचे पालन करून तोंडाला मास्क लावून आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सर्व आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने देण्यात आली आहे.

आंदोलनाच्या लढ्याच्या तिसऱ्या पर्वाची सुरवात तुळजापूर शहरातून

या बैठकीत अनेकांनी आक्रमक आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केला. मात्र मागे ज्याप्रमाणे लाखोंच्या संख्येने शांततेत मोर्चे काढले त्याच पद्धतीने सध्याचे आंदोलन हि करण्याच्या भूमिकेवर सर्वांचे एकमत झाले. आंदोलनाच्या लढ्याच्या तिसऱ्या पर्वाची सुरवात तुळजापूर शहरातून करण्यात येणार असून दि. ९ ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरात मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात जिल्हाभरातील बांधवांनी सहभागी होण्याच्या निर्णय घेण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी