खासदार राजीव सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले, कुटुंबियांसह कार्यकर्त्यांना शोक अनावर

औरंगाबाद
भरत जाधव
Updated May 17, 2021 | 11:14 IST

काँग्रेसचे खासदार अॅड. राजीव सातव यांचे काल कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर मागील 23 दिवसांपासून उपचार सुरू होते.

mp rajiv satav death cremation
खासदार राजीव सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सकाळी सहा वाजल्या पासूनच कार्यकर्त्यांनी खासदार सातव यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती.
  • पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर मागील 23 दिवसांपासून उपचार सुरू होते.
  • अॅड. राजीव सातव यांचे काल कोरोनामुळे निधन झाले.

औरंगाबाद :काँग्रेसचे खासदार अॅड. राजीव सातव यांचे काल कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर मागील 23 दिवसांपासून उपचार सुरू होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर कालच त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी आणण्यात आले. आज कळमनुरी येथील त्याच्या निवासस्थाना समोरील शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरासमोर ठेवले आहे.दरम्यान, आज सकाळी सहा वाजल्या पासूनच कार्यकर्त्यांनी खासदार सातव यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. 

कळमनुरी येथे काँग्रेसचे नेते नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री बंटी उर्फ सतेज पाटील, अमर राजूरकर यांनी खासदार राजीव सातव यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले.यावेळी परिवारातील सदस्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले अन परिवाराचा आश्रूंचा बांधच फुटला. यावेळी उपस्थितांनीही एकच हंबरडा फोडल्याने वातावरण गंभीर झाले. खासदार सातव यांचे पार्थिव कळमनुरीत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी रात्री मोठी गर्दी केली आहे. त्यांचे पार्थिव आज सकाळी आठ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, माजीमंत्री सातव, डॉ. सातव, मुलगा पुष्कराज, मुलगी युवराज्ञी, प्राचार्य बबन पवार यांनी अंत्यदर्शन घेतांना आश्रूंना वाट मोकळी करून दिली. एकीकडे आई व दुसरीकडे वयोवृध्द आई यांना सावरण्यासाठी पुष्कराज पुढे आला. त्यांनी दोघींनाही सावरले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी