खासदार संजय जाधव धमकी प्रकरण, एका संशयिताला घेतले नांदेडमधून ताब्यात

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Oct 30, 2020 | 12:01 IST

Sanjay Jadhav threat case, one suspect arrested from Nanded: प्रकरण गंभीर असल्यामुळे परभणी पोलिसांना तातडीने चौकशीचे आदेश देऊन या प्रकरणामागे कोण आहे? याचा छडा लवकरात लवकर लावावा, अशी विनंती केली आहे.

MP Sanjay Jadhav threat case, one suspect arrested from Nanded
खासदार संजय जाधव धमकी प्रकरण, एका संशयिताला घेतले नांदेडमधून ताब्यात   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मलाही कुणी सहज घेऊ नये, संजय जाधव यांनी दिला इशारा  
  • एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली
  • खासदारांनाच जीवे मारण्याची धमकीमुळे संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती

परभणी: परभणीतील (parabhani) कुणी तरी दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार दोन दिवसांपुर्वी शिवसेनेचे खासदार संजय जाधव (mp sanjay jadhav) यांनी नानल पेठ पोलिस ठाण्यात दिली होती. धमकी प्रकरणाचे धोगेदोरे नांदेडच्या (nanded) रिद्वा गॅगशी असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. दरम्यान सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नांदेडमधून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

खासदारांनाच जीवे मारण्याची धमकीमुळे संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती

शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटी रुपयांची सुपारी परभणीतून मिळाल्याची माहिती जाधव यांना समजली.  त्यानंतर खासदार संजय जाधव यांनी तातडीने नानलपेठ पोलीस स्टेशन गाठून सविस्तर तक्रार दाखल केली होती. खासदारांनाच जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात एकच खलबळ उडाली होती.

एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली

दरम्यान सदर प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या संशयिताकडून काय माहिती मिळते, त्याचा रिद्धां टोळीशी काही संबंध आहे का? नेमकं या सुपारी प्रकरणामागे कोण आहे? या संदर्भात संशयिताकडून काही माहिती मिळते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने स्थानिक पोलीसांचे एक पथक स्थापन करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

मलाही कुणी सहज घेऊ नये, संजय जाधव यांनी दिला इशारा  

प्रकरण गंभीर असल्यामुळे परभणी पोलिसांना तातडीने चौकशीचे आदेश देऊन या प्रकरणामागे कोण आहे? याचा छडा लवकरात लवकर लावावा, अशी विनंती आपण केली असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. मी ही धमकी सहज घेत नाही, पण मलाही कुणी सहज घेऊ नये, असा इशाराही संजय जाधव यांनी दिला. संजय जाधव यांनी या धमकी प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या देखील कानावर घातली आहे अशी माहिती देखील समोर आली आहे.

जीवे मारण्याची धमकी, सुपारी देणे हा प्रकार अतिशय गंभीर

कोण, कुठली रिद्धा गॅंग मला माहित नाही, पण मला जीवे मारण्यासाठी एवढ्या मोठ्या रक्कमेची सुपारी तीही परभणीतून कुणी दिली, याचा तपास लागणे गरजेचे आहे. आतापर्यंत व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या जात होत्या, आता थेट खासदार आणि राजकीय पुढाऱ्यांना धमक्या मिळत असल्याने यांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचेही खासदार जाधव म्हणाले. गेल्या तीस-पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक कटु प्रसंग अनुभवले पण माझे कुणाशी वैर नव्हते. राजकीय मतभेद किंवा वैमनस्य असेलही, पण जीवे मारण्याची धमकी, सुपारी देणे हा प्रकार म्हणजे अतिशय गंभीर आणि चिंता करायला लावणार आहे असं देखील जाधव यांनी म्हंटल आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी