लहानपणीचं आई वारली, वडील गेले तुरुंगात, तरीही मुलगा झाला PWD विभागात उच्चपदी नियुक्त

mpsc exam result 2020 osmanabad student success story vishnu kamble : सन २०१६ साली पॉलिटेक्निक परीक्षा शेवटच्या सत्रात ८९ टक्के घेऊन उत्तीर्ण झाले. पुढील Btech शिक्षणासाठी गुरू गोविंद सिंह अभियांत्रिकी विद्यालय नांदेड येथे प्रवेश घेतला. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे समाज कल्याण वसतिगृहात येथे राहून शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, विष्णू कांबळे यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या आजोळी जि. प. प्राथमिक शाळा चिंचोली भुयार ता उमरगा येथे झाले.

mpsc exam result 2020 osmanabad student success story vishnu kamble
लहानपणीचं आई वारली, वडील गेले तुरुंगात, तरीही मुलगा झाला....  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अवघ्या वयाच्या २४ व्या वर्षी विष्णू कांबळे यांनी हे नेत्रदीपक यश संपादन केले
  • वडील शैक्षणिक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ व सहकार्य करत नव्हते
  • एमपीएससी परीक्षा पास होऊन सहाय्यक कार्यकारी अभियंता (क्लास -१ pwd) पदी निवड झाली आहे.

उस्मानाबाद : अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या वयाच्या २४ व्या वर्षी विष्णू कांबळे यांनी हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (pwd) मध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता (assistant Executive Engineer) पदी विष्णू कांबळे या तरुणाची निवड झाली आहे. एमपीएससीमार्फत झालेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मध्ये विष्णू कांबळे यांनी खुल्या प्रवर्गातून ४१ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर अनुसूचित जाती (sc) प्रवर्गातून ते राज्यात प्रथम आले आहेत. विष्णू कांबळे हे ४ वर्षाचे असताना सन २००२ साली घरगुती हिंसाचारामुळे त्यांच्या आईचे निधन झाले होते, तर खुनाच्या आरोपाखाली वडील कारागृहात शिक्षा भोगत होते. मात्र, असं असताना देखील विष्णू कांबळे यांनी मोठ यश संपादन केल्याने त्यांचे आता जिल्हाभरात कौतुक होऊ लागले आहे. विष्णू कांबळे यांचे मूळ गाव मदनसुरी ता. निलंगा आहे. आईचे निधन आणि वडील तुरुंगात असल्याने तेव्हापासून त्यांचा सांभाळ मामा आणि आजी यांनी त्यांच्या आजोळी केला. विष्णू कांबळे यांनी सन २०१६ साली पॉलिटेक्निक परीक्षा शेवटच्या सत्रात ८९ टक्के घेऊन उत्तीर्ण झाले होते.

अधिक वाचा : ५ वर्षाच्या मुलाला कुत्र्यांच्या कळपाने चाऊन चाऊन चाऊन खाले

सन २०१६ साली पॉलिटेक्निक परीक्षा शेवटच्या सत्रात ८९ टक्के घेऊन उत्तीर्ण झाले. पुढील Btech शिक्षणासाठी गुरू गोविंद सिंह अभियांत्रिकी विद्यालय नांदेड येथे प्रवेश घेतला. परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे समाज कल्याण वसतिगृहात येथे राहून शिक्षण पूर्ण केले. दरम्यान, विष्णू कांबळे यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या आजोळी जि. प. प्राथमिक शाळा चिंचोली भुयार ता उमरगा येथे झाले. पुढील शिक्षणाची आजोळी सोय नसल्यामुळे लातूर येथील मावशीकडे राहून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

अधिक वाचा ; काल एमआयएमने काढलेल्या मोर्च्यातील कार्यकत्यावर गुन्हे दाखल

वडील शैक्षणिक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ व सहकार्य करत नव्हते

दरम्यान, सन २०१३ साली ९० टक्के घेऊन ते दहावी उत्तीर्ण झाले. परंतु आई नसल्याने व वडील शैक्षणिक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ व सहकार्य करत नसल्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी अडचण येत होत्या. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने कागदपत्रे मिळवून पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन (polytechnic) लातूर येथे सिव्हील इंजिनिअरच्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतला आणि आपले शिक्षण पूर्ण केले.

अधिक वाचा : गोवंशातील प्राण्यांमुळे प्रदूषण, शेतकऱ्यांवर टॅक्स 

एमपीएससी परीक्षा पास होऊन सहाय्यक कार्यकारी अभियंता (क्लास -१ pwd) पदी निवड झाली आहे.

२०१८ मध्ये त्यांनी कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा दिली व राज्यात १० वा क्रमांक मिळवून सार्वजनिक बांधकाम विभाग (pwd) मध्ये क्लास- २ अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मात्र, कांबळे यांचे स्वप्न होते की त्यांना क्लास १ पदी नौकरीत भरती व्हावे. दरम्यान , त्यांनी आपली जिद्द तशीच कायम ठेवत कोरोना काळातही अभ्यासात खंड पडू दिला नाही. दिवसा नोकरी व रात्री अभ्यास असे सूत्र वापरून पूर्व, मुख्य व मुलाखत असे परीक्षेचे तीन टप्पे पार करून एमपीएससी परीक्षा पास होऊन सहाय्यक कार्यकारी अभियंता (क्लास -१ pwd) पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी