Municipal corporation will take action on houses सोमवारी लेबर कॉलनीतील इमारातीवर बुलडोझर फिरणार , भाजप आणि एमआयएम नागरिकांच्या बाजूने

municipal corporation will take action on houses : महापालिकेचे पथक ही जागा ताब्यात घेणारच आहे, अशा ठाम विश्वास जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी व्यक्त केला. लेबर कॉलनीत पाडापाडी करण्यासाठी सोमवारी सकाळीच पालिकेची अतिक्रमण हटाव यंत्रणा जेसीबीसह जाणार आहे.

municipal corporation will take action on houses
सोमवारी लेबर कॉलनीतील इमारातीवर बुलडोझर फिरणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लेबर कॉलनीत पाडापाडी करण्यासाठी सोमवारी सकाळीच पालिकेची अतिक्रमण हटाव यंत्रणा जेसीबीसह जाणार
  • काही नागरिकांनी संताप व्यर्त करत कॉलनीत महापालिकेने लावलेला नोटीस बोर्डही फाडून टाकला
  • भाजप आणि एमआयएमनेदेखील नागरिकांच्या बाजूने भूमिका घेत प्रशासनाला आव्हान दिले

Municipal corporation will take action on houses  औरंगाबाद :  सोमवारी दिनांक ०८ नोव्हेंबरपासून इमारती पाडण्याची (Buildings in Labor colony) मोहीम महानगरपालिकेकडून (Aurangabad corporation) हाती घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या शेजारील विश्वास नगर, लेबर कॉलनीतील (Aurangabad Labor colony) २० एकर जागेवरील शासकीय इमारीत ७० वर्षे जुन्या व धोकादायक असल्याने या इमारती पडणार असल्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही लेबर कॉलनीसाठीची शेवटची दिवाळी ठरण्याची चिन्हे आहेत.

लेबर कॉलनीत पाडापाडी करण्यासाठी सोमवारी सकाळीच पालिकेची अतिक्रमण हटाव यंत्रणा जेसीबीसह जाणार

महापालिकेचे पथक ही जागा ताब्यात घेणारच आहे, अशा ठाम विश्वास जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी व्यक्त केला. लेबर कॉलनीत पाडापाडी करण्यासाठी सोमवारी सकाळीच पालिकेची अतिक्रमण हटाव यंत्रणा जेसीबीसह जाणार आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त चार दिवस प्रशासकीय सुट्या होत्या. त्यामुळे जीर्ण वसाहती पाडण्यासाठी सकाळीच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या नेतृत्वात ही मोहीम सुरू केली जाणार आहे. जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागाचे पथकदेखील तेथे असणार आहे. रहिवासी आणि प्रशासकीय यंत्रणेत कारवाईवरून तणाव होण्याची शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.

काही नागरिकांनी संताप व्यर्त करत कॉलनीत महापालिकेने लावलेला नोटीस बोर्डही फाडून टाकला

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महापालिका, बांधकाम विभागाने ३१ ऑक्टोबर रोजी रात्री लेबर कॉलनीतील सरकारी सदनिका पाडण्याचे आदेश जारी केल्यानंतर नागरिकांना सोमवारी सकाळीच राजकीय नेत्यांना साकडे घातले. तर काही नागरिकांनी संताप व्यर्त करत कॉलनीत महापालिकेने लावलेला नोटीस बोर्डही फाडून टाकला. दरम्यान, १९५३ पासून लेबर कॉलनीत सरकारी कर्मचाऱ्यांना घरे देण्यात आली होती. सध्या एक हजार कोटींच्या आसपास त्या जागेचे बाजारमूल्य आहे. ज्यांना निवासस्थाने दिली होती, त्यांपैकी कुणीही तेथे नसून सध्या तो परिसर गुन्हेगारांचा अड्डा होत चालला असल्याच पाहायला मिळत आहे. 

भाजप आणि एमआयएमनेदेखील नागरिकांच्या बाजूने भूमिका घेत प्रशासनाला आव्हान दिले

विशेषतः भाजप आणि एमआयएमनेदेखील नागरिकांच्या बाजूने भूमिका घेत प्रशासनाला आव्हान दिले आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या कारवाईवर नागरिक आणि राजकीय नेत्यांची काय प्रतिक्रिया असेल, याकडेच संपूर्ण औरंगाबादचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर , जिल्हाधिकाऱ्यांनी लेबर कॉलनीतील घरांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर नागरिकांनी राजकीय पक्षांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे नेत्यांनीदेखील या प्रकरणात प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी