"ओमराजे निंबाळकर नाटकी माणूस", स्व पवनराजे निंबाळकरांच्या सोबत्यांनी ओमराजेंवर केली सडकून टीका

Muralidhar Kulkarni severely criticized Omraje Nimbalkar : पवनराजे मित्रमंडळाचे संस्थापक श्यामभाऊ मुरलीधर कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Muralidhar Kulkarni severely criticized Omraje Nimbalkar
"ओमराजे निंबाळकर नाटकी माणूस" - मुरलीधर कुलकर्णी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कुलकर्णी यांनी केली सडकून टीका
  • उस्मानाबाद, कळंब तालुक्यामध्ये 188 शाखा रुजविण्याचे काम कुलकर्णी यांनी केले
  • डिसेंबर महिन्यामध्ये ढोकी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार

उस्मानाबाद : पवनराजे मित्रमंडळाचे संस्थापक श्यामभाऊ मुरलीधर कुलकर्णी यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान, ओमराजे निंबाळकर हे नाटकी असल्याचा आरोप देखील कुलकर्णी यांनी केला आहे. सर्वसामान्य तळागाळातील जनतेसाठी काम करणारे पवनराजे मित्र बरखास्त करून मित्र मंडळातील कार्यकर्ते व पदाधिकारी राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत  बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये सामील होणार असल्याची माहिती देखील कुलकर्णी यांनी दिली आहे. तसेच डिसेंबरमध्ये ढोकी येथे भव्य मेळावा घेणार असल्याची माहिती मित्रमंडळाचे संस्थापक श्यामभाऊ मुरलीधर कुलकर्णी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत 18 नोव्हेंबर रोजी दिली. या पत्रकार परिषदेला पवन राजे मित्र मंडळाचे अध्यक्ष काकासाहेब संदिपान खोत, सचिव भारत शिंदे, सत्यनारायण लोमटे, तेरणा कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन रमाकांत टेकाळे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा ; वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर व्हा सावध...

उस्मानाबाद, कळंब तालुक्यामध्ये 188 शाखा रुजविण्याचे काम कुलकर्णी यांनी केले

पुढे बोलताना  ते म्हणाले, पवनराजे निंबाळकर मित्र मंडळाच्या माध्यमातून उस्मानाबाद व कळंब तालुक्यामध्ये 188 शाखा रुजविण्याचे काम आपण केले. त्यामुळे 2004  मधील विधानसभा निवडणुकीत पवनराजेनिंबाळकर विजयाच्या टप्प्यात आले. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. मात्र ते केवळ मित्र मंडळाच्या सहकार्यामुळे व संघटन कौशल्यामुळे, पवन राजे मित्र मंडळाच्या माध्यमातून 8 हजार पेक्षा जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते जोडले गेले. त्या माध्यमातून कै  पवन राजनिंबाळकर यांच्या राजकीय वाटचालीत साथ दिली असल्याचं देखील कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : 'राहुल गांधींमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते', राऊत चिडले

डिसेंबर महिन्यामध्ये ढोकी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार

पवन राजेनिंबाळकर यांच्या दुर्दैवी हत्तेनंतर आजपर्यंत मित्र मंडळाच्या माध्यमातून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मदत केली. आमदार म्हणून त्यांनी ५ वर्ष काम केले. या काळात एकही रुपयाचा विकास निधी दिला नाही. तर आता ते 3 वर्षापासून खासदार आहेत. या काळात देखील त्यांनी विकास कामासाठी एकही रुपयांचा निधी दिला नसल्याचा आरोग्य त्यांनी केला. त्यामुळे ही मोठी खंत असून त्यांच्यात झालेला बदल व अन्य परिस्थितीमुळे आगामी काळात 188 शाखा व त्यांचे सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मित्र मंडळ बरखास्त करून बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये सहभाग होण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये ढोकी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा ; वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर व्हा सावध... 

येत्या काही महिन्यात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश रणार

दरम्यान, येत्या काळात ओमराजे निंबाळकर यांना अनेक मोठे धक्के बसणार असल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी