उस्मनाबाद : चिडविल्याने राग आल्याने एका मुलाने ५ वर्षीय बालकांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे घडली आहे. मात्र, सदर प्रकरणात पोलिसांनी काही तासातच खुनाचा छडा लावला आहे. चिडविल्याचा राग आल्याने गावातील एका अल्पवयीन मुलाने ५ वर्षाच्या मुलाचा खून केला आहे. दोरीने गळा दाबून हा खून केला असल्याचं उघड झालं असून, यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्राईम पेट्रोल पाहून खून केला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपीने इंटरनेटवर अल्पवयीन आरोपीला खुनाच्या गुन्ह्या अंतर्गत किती शिक्षा होते यासह कायदेशीर प्रक्रियेची माहिती घेल्याचे देखील समोर आले आहे. ओम मनोज बागल असं खून झालेल्या बालकाचे नाव आहे.
दरम्यान, घडलेली एकंदरीत घटना अशी आहे की, आरोपीला गावात कंट्या म्हणून चिडवीत होते त्यामुळे मयत ओम बागल या मुलाने त्याला कंट्या म्हणून हाक मारली. कंट्या म्हणाल्याचा राग आरोपीला आला आणि त्याने ओमच्या कानशिलात लगावली त्यानंतर तो ओम हा बेशुद्ध झाला व त्यानंतर आरोपीने त्याला घरात नेहून नायलॉन दोरीने गळा आवळला आणि त्याच्या कानातली बाली काढून स्वतःच्या बूट मध्ये लपवली. त्यानंतर त्या मृतदेहवर गादी इतर सामान टाकून तो शेजारी राहत असलेल्या चुलत्याच्या घरात नेहून टाकला. आरोपी ११ वी सायन्स शाखेत शिकत होता त्याच्या घरापासून जवळ सदर मयत राहत होता. दरम्यान, खुन केल्यावर रात्रभर या मुलाने इंटरनेटवर खून केल्यावर काय शिक्षा होते याची देखील माहिती घेतली होती. त्यानंतर आरोपीने स्वतः सकाळी वडिलांना दारात हात दिसले असे सांगितले. या आरोपी मुलाला क्राईम पेट्रोल पाहण्याचे व्यसन होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे,आजीनाथ काशीद यांच्या पथकाने ही कामगिरी केली.