पाच वर्षीय बालकाची निघृण हत्या, शेजारच्या घरात आढळला मृतदेह, गोळी आणण्यासाठी गेला होता घराबाहेर

Murder of a five-year-old boy : आज शुक्रवारी सकाळी या मुलाच्या घराशेजारील असलेल्या एका घरात त्याचा मृतदेह सापडला त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या मुलाच्या दोन्ही कानात सोन्याची बाली होती मात्र ती गायब असल्याचे समोर आले आहे.

Murder of a five-year-old boy
पाच वर्षीय बालकाची निघृण हत्या, शेजारच्या घरात आढळला मृतदेह  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका पाच वर्षीय बालकाचा निर्घुणपणे खून करण्यात आला आहे.
  • मुलाच्या शरीरावर जखमा असून गळा दाबून खून केल्याचे प्रथमदर्शी दिसुन येत आहे
  • मुलाच्या घराशेजारील असलेल्या एका घरात त्याचा मृतदेह सापडला

उस्मानाबाद : जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे मन सुन्न करणारी घटना घडली असून एका पाच वर्षीय बालकाचा निर्घुण खून करण्यात आला आहे. मुलाच्या शरीरावर जखमा असून गळा दाबून खून केल्याचे प्रथमदर्शी दिसुन येत आहे. सदर घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ओम मनोज बागल असं या बालकाचे नाव असून काल दुपारी हा लहान मुलगा गोळी आणण्यासाठी घराबाहेर पडला होता त्यानंतर तो घरी परतला नसल्याने एकच धावपळ उडाली. घरच्यांनी रात्रभर शोध घेतला मात्र हा मुलगा सापडू शकला नाही.

मुलाच्या दोन्ही कानात सोन्याची बाली होती मात्र ती गायब असल्याचे समोर आले

आज शुक्रवारी सकाळी या मुलाच्या घराशेजारील असलेल्या एका घरात त्याचा मृतदेह सापडला त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. या मुलाच्या दोन्ही कानात सोन्याची बाली होती मात्र ती गायब असल्याचे समोर आले आहे. मुलाचा खून नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी डॉग स्कॉड आले आहे. तुळजापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत .पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील दुसरी क्राईम बातमी 

तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळा (खु.), ता. तुळजापूर येथील ओमराजे रामलिंग भोसले हा १४ वर्षीय मुलगा दि. १४ डिसेंबर रोजी ४ वाजता “मी क्रीकेट खेळायला जात आहे.” असे कुटूंबीयांस सांगून घराबाहेर पडला परंतु उशीरापर्यंत घरी न परतल्याने कुटूंबीयांनी त्याचा परिसरात, नातेवाईकांकडे शोध घेतला असता काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावर त्याचे कोण्या अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरन केले असावे. अशा प्रकारची तक्रार आई- हेमा रामलिंग भोसले यांनी दि. १५ डिसेंबर रोजीदिली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.  

१७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

उस्मानाबाद येथील एक १७ वर्षीय मुलगी सोलापूर येथील रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली होती. तिच्या वयाबाबत रुग्णालय प्रशासनास संशय आल्याने त्यांनी खातरजमा केली असता तिचे वय १७ वर्षे असल्याचे निष्पन्न झाले. तिचा बाल विवाह झाला असून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समजले. यावरुन तिचा पती व सासू यांच्याविरुध्द सोलापूर शहरातील एका पोलीस ठाण्यात  कलम- ३७६, ३४ आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी