उस्मानाबाद : राज्यात झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा आज निकाल हाती आला आहे. सदर निवडणुकीत अनेक नेत्यांची या निवडणुकीत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दरम्यान, निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर अनेक दिग्गजांना मोठा झटका लागल्याचे पाहायला मिळाले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील १०६ नगरपंचायतींमध्ये कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सदर निवडणुका या ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर न्यायालयाच्या निकालानंतर खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात आली होती. दरम्यान, या निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर मराठवाड्यात भाजपने आपलं पहिलं स्थान मिळवलं असल्याच दिसून येत आहे. कारण भाजपने १०२ जागा मिळवल्या आहेत. तर शिवसेने ७४, राष्ट्रवादी कॉंग्रेस हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्याचबरोबर काँग्रेसने ८० जागा मिळवल्या आहेत. आणि इतर ४१ जागांवर विजयी झाले आहेत.
औरंगाबाद
१ ) भाजप – ०६
२ ) शिवसेना – ११
उस्मानाबाद
१ )भाजप - १०
२ ) शिवसेना - १६
३ ) राष्ट्रवादी - ०२
४ ) काँग्रेस - ०४
५ ) इतर - ०३
बीड :
१ )भाजप – ४७
२ ) शिवसेना – ०२
३ ) राष्ट्रवादी – २१
४ ) काँग्रेस – ०५
५ ) इतर - १०
जालना
१ ) राष्ट्रवादी – ३४
२ ) शिवसेना – २२
३ ) भाजप – १४
४ ) काँग्रेस – ०९
५ ) इतर - ०६
लातूर
१ ) भाजप – १४
२ ) शिवसेना – ०६
३ ) राष्ट्रवादी – १४
४ ) काँग्रेस – २३
५ ) इतर – ११
परभणी
१ ) भाजप – ०१
२ ) शिवसेना - ००
३ ) राष्ट्रवादी – १०
४ ) काँग्रेस – ००
५ ) इतर – ०६
नांदेड
१ ) भाजप – ०३
२ ) शिवसेना – ०३
३ ) राष्ट्रवादी - ०८
४ ) काँग्रेस - ३३
५ ) इतर – ०४
हिंगोली
१ ) भाजप – ०७
२ ) शिवसेना - १४
३ ) राष्ट्रवादी - ०५
४ ) काँग्रेस - ०६
५ ) इतर - ०२
सदर आकडेवारीनुसार मराठवाड्यात भाजपला १०२ जागा मिळाल्या असून, या जागा इतर पक्षाच्या जागेच्या तुलनेत जास्त असल्याने भारतीय जनता पार्टीच्या जागा मराठवाड्यात या सर्वाधिक असल्याचं पहायला मिळत आहे. तर शिवसेना ७४ ,राष्ट्रवादी ९४ , काँग्रेस ८० आणि अपक्षांना ४१ जागा मिळाल्या आहेत.