नाना पटोलेंचा केंद्र सरकावर जोरदार निशाणा, भाजप सरकार अधिकाऱ्यांना तोडपाणी करायला सांगतेय

भाजप सरकार अधिकाऱ्यांना  तोडपाणी करायला सांगत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला

nana patole targeted modi goverment
भाजप सरकार अधिकाऱ्यांना तोडपाणी करायला सांगत आहे - पटोले   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले
  • हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे
  • देशातील तरुणांना ड्रग्जमध्ये डुबवण्याचे पाप भाजपचे सरकार करत आहे

बीड : केंद्रातील भाजप सरकार हे ब्लॅकमेलिंग सरकार आहे. भाजप सरकार अधिकाऱ्यांना  तोडपाणी करायला सांगत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे. नाना पटोले यांनी केलेल्या या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिबसापासून राज्यात शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खान अटक (Aryan Khan arrest case) केल्याने अनेक वाद निर्माण झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) पंच किरण गोसावीने २५ कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे आता राजकीय वाद पेटला आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना नाना पटोले यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले

नवनिर्वाचित खासदार म्हणून रजनीताई पाटील निवड झाल्यानंतर अंबेजोगाई शहराच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या मेळाव्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असता नाना पटोले यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. अंबेजोगाई येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा पार पडला. 

हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे

दरम्यान, नाना पटोले यांनी भाजपवर टीका करत म्हटल आहे की, एनसीबीच्या कारवाईमध्ये भाजपचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे, त्यांनी अद्याप पर्यंत कुठलेही व्हिडीओ समोर दिले नाहीत, त्यांनी शाहरुख खानच्या मुलाला अडकवण्यासाठी केलेले हे प्रकरण होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याबरोबर या माध्यमातून हिंदू-मुस्लीम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील नाना पाटोळे यांनी केला आहे. दरम्यान, भाजप आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

भाजप सरकार च्या काळात दोन वर्षे छगन भुजबळ कारागृहात होते.

भाजप सरकार च्या काळात दोन वर्षे छगन भुजबळ कारागृहात होते. आता त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा दुरुपयोग करतात याचं हे उदाहरण आहे. 'लोकशाहीमध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीने सरकार आलेले आहे. तुम्ही आमच्या विरोधात आहे तर तुमच्या विरोधात आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करू, असे धोरण आखून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. 

देशातील तरुणांना ड्रग्जमध्ये डुबवण्याचे पाप भाजपचे सरकार करत आहे

देशात आतापर्यंत किती आले याची चौकशी व्हावी. देशातील तरुणांना ड्रग्जमध्ये डुबवण्याचे पाप भाजपचे सरकार करत आहे. मुद्रा पोर्टवर २१ हजार कोटीचे जे ड्रग्ज मिळालं त्यात पोर्ट कुणाच्या ताब्यात होती त्याचा मालक कोण होता. असा सवाल देखील नाना पाटोले यांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी