तोतया डॉक्टरने महिला रुग्णावर केला शारीरिक अत्याचार , गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताचं काढला पळ

Nanded Bogus Doctor Rapes Lady Patient : पिडीत मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याच्यारानंतर थेट पोलीस ठाणे गाठले असून, पोलिसाकडे तक्रार दिली आहे. इस्लापूर पोलिसांनी देखील तरुणीच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेतला आहे

Nanded Bogus Doctor Rapes Lady Patient
तोतया डॉक्टरने महिला रुग्णावर केला शारीरिक अत्याचार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आरोपी डॉक्टर नेवाकुमार मंडल हा छत्तीसगड राज्यातील रहिवासी
  • माझ्याशी संबंध ठेव, अन्यथा तुझे अश्लील फोटो व्हायरल करेन – तोतया डॉक्टर
  • गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच डॉक्टरने पळ काढला

नांदेड : गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने एका तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड येथे घडला आहे. एका तोतया डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार आरोप तरुणीने केला आहे. सदर घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.  त्याशिवाय पीडित तरुणीचे तोतया डॉक्टरने अश्लील फोटो काढले असून ते फोटो व्हायरल करण्याची धमकीही तो तिला देत होता,  अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

माझ्याशी संबंध ठेव, अन्यथा तुझे अश्लील फोटो व्हायरल करेन – तोतया डॉक्टर

दरम्यान, सदर तरुणीचे अश्लील फोटो देखील काढून ठेवले होते. माझ्याशी संबंध ठेव, अन्यथा तुझे अश्लील फोटो व्हायरल करेन, अशी धमकी हा डॉक्टर सातत्याने तरुणीला देत होता. त्याचबरोबर तोतया डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या तरुणीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. सदर घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, सदर डॉक्टरचा शोध घेतला जात आहे. सदर डॉक्टर आरोपीचे नाव नेवाकुमार मंडल असं आहे.

गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच त्याने पळ काढला

पिडीत मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याच्यारानंतर थेट पोलीस ठाणे गाठले असून, पोलिसाकडे तक्रार दिली आहे. इस्लापूर पोलिसांनी देखील तरुणीच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेतला आहे. मात्र , तोतया बंगाली डॉक्टरला गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच तो पळून गेला आहे. मात्र, पोलीस त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

आरोपी डॉक्टर नेवाकुमार मंडल हा छत्तीसगड राज्यातील रहिवासी

या घटनेतील आरोपी डॉक्टर नेवाकुमार मंडल हा छत्तीसगड राज्यातील रहिवासी असून त्याने बोगस डॉक्टरी करण्याचा आपला धंदा करत असताना हे कृत्य केलं आहे. नांदेड जिल्ह्यात आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्यातील शिवनी गावातील ही धक्कादायक घटना आहे. दरम्यान, असे अनेक डॉक्टर महाराष्ट्रातील विवध जिल्ह्यात आपले दुकान मांडून बसले असून, त्यांच्या बोलण्यात ते उपचारासाठी आलेल्या रुग्णांना फसवत असल्याच्या देखील अनेक घटना या अगोदर घडल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी