College principal asked sexual favours to teacher: नांदेड जिल्ह्यातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या एका महिला प्राध्यापकाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. प्रायार्यांनी आपला विनयभंग केला आणि शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना राज्याचे माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेत घडली आहे. (Nanded college woman professor alleged principal demanding sexual favour maharashtra crime news marathi)
या प्रकरणी यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य . गणेशचंद्र शिंदे यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित प्राध्यापिकेने आरोप केला आहे की, प्राचार्यांनी आपला विनयभंग केला. प्राचार्य गेल्या दोन वर्षांपासून आपल्याला बदली करण्याची धमकी देत आहेत.
दोन वर्षांपासून प्राचार्य आपल्यासोबत अश्लील भाषेत बोलून विनयभंग करत आहेत. आता त्यांनी हद्द पार करत शरीरसुखाची मागणी केली. ज्यावेळी मी त्यांना स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला तेव्हा त्यांनी मला अन्य ठिकाणी बदली करण्याची धमकी दिली. त्यानंतर मी या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित शिक्षिकेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा : धक्कादायक! शाळेला बनवलं मसाज पार्लर, शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांकडून शिक्षिका मालिश करुन घेते, Video व्हायरल
माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी प्राचार्यांची अद्याप प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. तसेच आरोपी प्राचार्यांना अद्याप अटक सुद्धा झालेली नाहीये. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.
७ जुलै रोजी दिल्लीतही अशाच प्रकारीच एक घटना घडली आहे. आरोपी शिक्षक हा महिलेचा छळ करत होता. दिल्लीतील कल्याणपुरी येथे तो राहत असून त्याचे नाव राजेश मीना असे असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी शिक्षक आणि पीडित महिला हे एकाच शाळेत शिकवत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. पीडित महिलेने शिक्षण विभाग आणि पोलिसांकडे या प्रकरणी दीड वर्षांपूर्वी कथित छळाची तक्रार केली होती अशी माहितीही समोर आली आहे.