नांदेड : डॉक्टर देवानंद जाजू यांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने नांदेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टर देवानंद जाजू यांच्या आत्महत्येचे नेमकं कारण काय? हे अद्याप समोर आले नाही. डॉक्टर देवानंद जाजू हे नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांच्या अशा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, नांदेडचे ग्रामीण पोलीस याप्रकरणी तपास करत असून तपासाअंती सत्य बाहेर येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
अधिक वाचा ; अजून दोन दिवस मुंबईत पाणी कपात, या भागात होणार मोठा परिणाम
डॉ. जाजू यांनी आत्महत्या का केली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण जाजू हे शहरातील प्रसिद्ध डॉक्टर होते. तसेच ते शहरातील प्रसिद्ध जाजू हॉस्पिटलचे प्रमुख होते. देवानंद जाजू यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आपलं आयुष्य संपविल्याची धक्कादायक बातमी ही नांदेड शहरवासियांना मनाला चटका लावणारी आहे आहे. डॉक्टर देवानंद जाजू हे भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख देखील होते.
अधिक वाचा ; OTT वर झळकण्यासाठी हिरोपंती २ सज्ज, या दिवशी होणार प्रदर्शित
अधिक वाचा : Navjot Singh Sidhu: जेलमध्ये सिद्धूसाठी आहे हे स्पेशल डाएट