धक्कादायक! नांदेडमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ, मुलींच्या हॉस्टेलमध्ये घडली घटना, शिक्षकावर गुन्हा

नांदेड जिल्ह्यात (nanded district) मुलींच्या हॉस्टेलमध्ये (girl hostel) रॅगिंगचा प्रकार घडल्याची धक्कादायक घटना

nanded nursing college hostel ragging
मुलींच्या हॉस्टेलमध्ये घडली घटना, शिक्षकावर गुन्हा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हॉस्टेलला राहत असणाऱ्या विशिष्ट समाजातील मुलीचे रॅगिंग
  • इतर कुठे तक्रार केल्यास शैक्षणिक नुकसान करण्याची धमकीही दिली असल्याचा आरोप
  • महाराष्ट्रात छळवणूक रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम १९९९ कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल

नांदेड : नांदेड जिल्ह्यात (nanded district) मुलींच्या हॉस्टेलमध्ये (girl hostel) रॅगिंगचा प्रकार घडल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पौळ नर्सिंग कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये सदर प्रकार घडला आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगावमध्ये (hadagav) पौळ नर्सिंग कॉलेज आहे. सदर घटनेत एक शिक्षक देखील सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. सदर शिक्षक हा महाविद्यालयातील असून, त्याच्यासोबत इतर दोन विद्यार्थिनीनी त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची रॅगिंग केली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षक आणि इतर दोन मुलींवर रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हॉस्टेलला राहत असणाऱ्या विशिष्ट समाजातील मुलीचे रॅगिंग

आपल्यासमोर नाक घास असं म्हणत त्या मुलींनी छेडछाड केल्याचाही प्रकार घडला आहे. त्याचबरोबर पीडित मुलीला कपडे काढ, झाडू मार असा आदेश देत सगळी कामं जबरदस्तीनं करून घेऊन शारीरिक व मानसिक छळ करत रॅगिंग केल्याच उघड झालं आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव शहरातील गोविदराव पौळ नर्सिंग कॉलेजातील शिक्षक भगिरथ शिंदे आणि हॉस्टेलमधील दोन मुलींनी त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या व हॉस्टेलला राहत असणाऱ्या विशिष्ट समाजातील मुलीचे रॅगिंग केलं आहे. सदर घटनेने जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

इतर कुठे तक्रार केल्यास शैक्षणिक नुकसान करण्याची धमकीही दिली असल्याचा आरोप

तुला काम लावले तर काय झालं असं म्हटल्याचं त्या मुलीने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणाची इतर कुठे तक्रार केल्यास शैक्षणिक नुकसान करण्याची धमकीही दिली असल्याचं देखील पिडीतेनी म्हटलं आहे. त्याचबरोबर वाईट उद्देशाने नको त्या भागाचा स्पर्श केला व तू हलक्या जातीची आहेस असं पौळ नर्सिंग कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमधील या कृत्याची तक्रार करण्यासाठी फर्यादी मुलगी गेली तेव्हा भगीरथ शिंदे यांनी असं कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात छळवणूक रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम १९९९ कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी देखील दखल घेत पोलिस ठाणे हदगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३ / २०२१ भादवी कलमानसार महाराष्ट्रात छळवणूक रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम १९९९ कलम ४ यासह ३५४ सह अनुसुचित जाती जमाती अधिनियम प्र अधिकलम ३ (१) (आर) (डब्यलु) (१) (२) सह प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी