Bharat Jodo Yatra : शरद पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दिली माहिती

Bharat Jodo Yatra : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार भारत जोडो यात्रेत येणार नसल्याचे रमेश यांनी सांगितले.

sharad pawar
शरद पवार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत.
  • काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार भारत जोडो यात्रेत येणार नसल्याचे रमेश यांनी सांगितले.

Bharat Jodo Yatra : नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार भारत जोडो यात्रेत येणार नसल्याचे रमेश यांनी सांगितले. (ncp chief will not join bharat jodo yatra due to health issue says congress leader jayram ramesh )

अधिक वाचा : Uddhav Thackeray : संजय राऊत यांना एखाद्या प्रकरणात गोवून पुन्हा अटक करतील, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली शंका

गुरूवारी एका पत्रकार परिषदे जयराम रमेश म्हणाले की, नुकतंच शरद  पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे पवार या यात्रेत सहभागी होणार नसल्याचे रमेश यांनी सांगितले. जेव्हा राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार होती तेव्हा पवार या यात्रेत सहभागी होणार होते, परंतु तब्येतीच्य कारणास्तव पवार या यात्रेत सहभागी होणार नाहीत. शरद पवार जेव्हा रुग्णालयात होते तेव्हा राहुल गांधी आणि पवार यांची फोनवर चर्चा झाल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली.

अधिक वाचा : Afzal Khan Tomb : किल्ले प्रतापगड परिसरात छावणीचे स्वरुप, अफजल खानची कबर परिसरात असा पडला पहिला हतोडा, पहा Live Video

नुकंतच पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नांदेड येथे राहुल गांधीसोबत भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला. या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेही उपस्थित होते.  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भारत जोडो अभियानात सहभाग दर्शवल्यानंतर आता शिवसेना नेते माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरे आज राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत चालतील. 

अधिक वाचा :  100 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मातोश्रीवरून फोन, संजय राऊतांच्या डोळ्यात आश्रू अन् चेहऱ्यावर हसू , VIDEO

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी