NCP महाविकासआघाडीचा फॉर्मुला उस्मानाबादेत ठरणार फेल ! , येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत 'या' पालिकेत राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा 

NCP going to fight election independently : राज्यात सत्तेत जरी राष्ट्रवादी , कॉंग्रेस आणि  शिवसेना एकत्र असले तरी मात्र, येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत महाविकासआघाडी होते की नाही याची मात्र शाश्वती नाही.

NCP going to fight election independently
महाविकासआघाडीचा फॉर्मुला उस्मानाबादेत ठरणार फेल !  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कार्यकर्ते यांच्या मागण्यानुसार स्वबळावर भर दिला जाणार असल्याची माहिती
  • १४ नगरसेवकांना राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केल्याने ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित
  • उस्मानाबाद जिल्ह्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षाची शिवसेना पक्षाशी स्पर्धा

NCP going to fight election independently  उस्मानाबाद : राज्यात सत्तेत जरी राष्ट्रवादी , कॉंग्रेस आणि  शिवसेना एकत्र असले तरी मात्र, येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत महाविकासआघाडी होते की नाही याची मात्र शाश्वती नाही. कारण , उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद , कळंब व तुळजापूर या तीन नगर परिषदेच्या बाबतीत जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत. या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा स्वबळाचा आग्रह असल्याने कार्यकर्ते यांच्या मागण्यानुसार स्वबळावर भर दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली आहे.

१४ नगरसेवकांना राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केल्याने ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित

दरम्यान, पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या नगरसेवक , पदाधिकारी यांचे निलंबन करून लवकरच पक्षात साफसफाई मोहीम हाती घेतली जाणार असुन पक्ष निष्ठ कार्यकर्ते ,पदाधिकारी यांना संधी दिली जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तुळजापूर नगर परिषदेचेच्या १४ नगरसेवकांना राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केल्याने ६ वर्षाकरिता पक्षातून निलंबित करण्यात आले आहे हा निर्णय त्याच दृष्टीने घेतला असुन पक्ष विरोधी काम केलेल्याना पक्षातून काढले जाणार आहे. ३ तालुक्यातील पदाधिकारी यांची बैठक झाली असुन आगामी काळात उर्वरित तालुक्यात बैठक लवकरच होणार आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षाची शिवसेना पक्षाशी स्पर्धा

राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा निरीक्षक रमेश बारस्कर यांच्या बैठकीत पक्षाच्या कार्यकर्ते यांनी स्वबळाचा आग्रह धरला असुन त्याप्रमाणे तयारी व मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी पक्ष वाढ व विस्तारासाठी प्रत्येक पक्ष तयारी करीत असतो असे ते म्हणाले. उस्मानाबाद जिल्ह्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी पक्षाची शिवसेना पक्षाशी थेट स्पर्धा आहे. गाव व स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष आमने सामने असतात त्यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत कार्यकर्ते यांचा स्वबळाचा आग्रह आहे. कार्यकर्ते सोबतच पदाधिकारी व जिल्हा स्तरीय नेतेही स्वबळावर ठाम आहेत असे बिराजदार म्हणाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी