Bharat Jodo Yatra भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे 'या' नेत्यांसह भारतीय रणजी क्रिकेट संघाच्या महिला खेळाडूही होणार सहभागी

NCP leaders will also participate in Bharat Jodo Yatra today ; काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधीं यांनी  सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा आज 64 वा दिवस आहे. तसेच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन आज चौथा दिवस आहे. सकाळी सहा वाजल्यापासून राहुल गांधी यांच्या पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात झाली असून,  आज या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार आहेत.

 'These' leaders of NCP will participate in Bharat Jodo Yatra today
भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे 'हे' नेते आज होणार सहभागी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आली आहे.
  • आज राष्ट्रवादीचे नेतेही होणार भारत जोडो यात्रेत सहभागी
  • राहुल गांधी विविध घटकातील लोकांना भेटून साधतायेत संवाद

नांदेड : राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) नांदेडमध्ये आली आहे. या यात्रेला मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातून मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या यात्रेचा नांदेडमध्ये आज चौथा दिवस आहे. या यात्रेत डॉक्टर, इंजिनिअर, वकील, राजकीय नेत्यासह खेळाडूही दाखल झाले आहेत. ज्यामध्ये भारतीय रणजी क्रिकेट संघाच्या महिला खेळाडू असणाऱ्या नॅश नुसरत अली ह्या देखील सहभागी झाल्या आहेत. नॅश नुसरत अली या महाराष्ट्रभर ही यात्रा करणार आहेत. डिऑन नॅश या फास्ट बॉलरच्या नावे नुसरत अली यांचे टोपण नाव क्रिकेटर श्रीनाथ यांनी नॅश नुसरत अली असे ठेवलं आहे.

अधिक वाचा ; ATM कार्ड विसरलात? स्मार्टफोनच्या मदतीने काढा एटीएममधून पैसे

राष्ट्रवादीचे नेतेही होणार भारत जोडो यात्रेत सहभागी

काँग्रेस  खासदार राहुल गांधीं यांनी  सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेचा आज 64 वा दिवस आहे. तसेच भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन आज चौथा दिवस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी यांच्या पद यात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात झाली आहे. रणजी महिला खेळाडूसह आज या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवारदेखील सहभागी होणार आहे.

अधिक वाचा ; चंद्रग्रहणामुळे भूकंप? काय आहे ग्रहण आणि भूकंपाचं कनेक्शन? 

राहुल गांधी विविध घटकातील लोकांना भेटून साधतायेत संवाद

नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान, आज सकाळी सहा वाजता नायगाव तालुक्यातील कापशी गुंफा या ठिकाणाहून भारत जोडो यात्रेची उत्साहात सुरुवात झाली. आज नांदेड शहरात 10 वाजण्याच्या सुमारास पोहोचेल. त्यानंतर देगलूर नाका बाफना टी पॉईंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले पुतळा या  प्रमुख रस्त्यावरून व चौकातून मार्गक्रमण करत संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा घेत आजचा या यात्रेचा टप्पा संपेल, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, यात्रा सुरू असताना राहुल गांधी हे विविध घटकातील लोकांना भेटून संवाद देखील साधत आहेत.

अधिक वाचा ; ठाकरे गटाची मुलुखमैदान तोफ पुन्हा धडाडणार, राऊतांना जामीन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी