Nanded Crime News मुलगी देण्यास नकार दिला म्हणून भाच्याने मामाची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या

nephew kills uncle for refusing to give his daughter for marriage : मामाने आपल्याला लग्नासाठी मुलगी दिली नसल्याचा राग मनात ठेवून भाच्याने घराबाहेर झोपलेल्या ममावर कुऱ्हाडीने सपासप वार करत ठार केले.

nephew kills uncle for refusing to give his daughter for marriage
भाच्याने मामाची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाच्याने मामाचा केला निघ्रुणपणे खून
  • एकतर्फी प्रेमातून भाच्याने मामाचा खून केल्याची घटना
  • घराबाहेर झोपलेल्या मामावर भाच्याने केले कुऱ्हाडीने वार

नांदेड  : एकतर्फी प्रेमातून अनेक हत्या (Murder) झाल्याचे आपण सतत वाचत किंवा ऐकत असतो. एकतर्फी प्रेमातून अशीच एक धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात (Nanded District) घडली आहे. मामाच्या मुलीवर जीव आला मात्र मामाने मुलीला आपल्या भाच्याला देण्यास नकार दिला. अखेर भाच्याने थेट आपल्या मामाला कुऱ्हाडीने संपविले असल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. मिलेलेल्या माहितीनुसार , आरोपी हा त्यांच्या मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. तसेच तो आपल्या मामाला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे असं म्हणत होता. मात्र, मामाने या लग्नाला अनेकवेळा नकार दिला होता. अनेक प्रयत्न केल्यावरही मामा लग्नाला तयार न झाल्याने अखेर आरोपी तरुणाने आपल्या मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. एकतर्फी प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. (nephew kills uncle for refusing to give his daughter for marriage)

अधिक वाचा ; आहारात करा या बियांचा समावेश...मग पाहा जादू, आजार राहतील दूर

अशी घडली घटना?

दरम्यान, एकनाथ बंधु जाधव असं आरोपी भाच्याचे नाव आहे. तर,  बालाजी काकडे असं मयत मामाचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी सांगितले या घटनेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मामाचा खून करणाऱ्या आरोपी भाच्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. आरोपी तरुणाचे वय १९ इतके आहे. सदर घटना नांदेड जिल्ह्यातील अर्द्धापुर तालुक्याच्या छाबरा गावात ही घटना घडली. आरोपी एकनाथला त्याचे मामा बालाजी काकडे यांच्या मुलीशी लग्न करायचे होते. एकनाथचे मामाच्या मुलीसोबत एकतर्फी प्रेम देखील होते. त्याने अनेकदा मामाला तुमच्या मुलीसोबत मला लग्न करायचे आहे असं सांगितले होते. मात्र, मामाने  लग्नाला साफ नकार दिला. मात्र, एकतर्फी प्रेमात आंधळा झालेल्या या तरुणाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मामाला आपल्या रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची हत्या केली.

अधिक वाचा : लोकांना अपेक्षित असणारे निर्णय सरकार घेणार: मुख्यमंत्री 

घराबाहेर झोपलेल्या मामावर आरोपीने केले कुऱ्हाडीने वार

रात्री बालाजी काकडे हे आपल्या घराच्या बाहेर झोपले होते. याचवेळी आरोपी एकनाथ हा कुऱ्हाडी घेऊन आला आणि त्याने आपल्या मामावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामध्ये मामाचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबातील लोकं उठल्यानंतर त्यांना ही घटना समजली. त्यानंतर कुटुंबातील मंडळींनी एकनाथ यांच्यावर संशय असल्याचे पोलिसांना संगीतले. पोलिसांनी  एकनाथवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. त्याची अनेकदा चौकशी करण्यात आली. मात्र, तो वारंवार आपला जबाब बदलत राहिला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने घटनेची कबुली दिली आहे.

अधिक वाचा : मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी सीएम शिंदेंच्या विविध घोषणा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी