उकळत्या तेलातून नाणे काढण्याच्या घटनेला धक्कादायक वळण, पोलिसाच्या जाचामुळे केले कृत्य

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 22, 2021 | 19:55 IST

new twist to the case in Osmanabad district: पीडित महिलेने गावातील एक व्यक्ती आणि परंडा पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याने संबंधित माझायावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात केला आहे.

new twist to the case in Osmanabad district
उकळत्या तेलातून नाणे काढण्याच्या घटनेला धक्कादायक वळण  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • एका पोलिस कर्मचाऱ्याने केला लैंगिक अत्याच्यार - महिलेचा गंभीर आरोप
  • नवऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार
  • जर तिचा हात भाजला तर तिला चारित्र्यहीन असल्याचं जाहीर केलं जातं​

उस्मानाबाद : पारधी समाजातील (paradhi samaj) एका महिलेला  आपण चारित्र्यसंपन्न आहोत असं सिद्ध करण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, पारधी समाजातील तशी प्रथाच आहे.  सदर महिलेला उकळत्या तेलात हात घालावा लागला होता. दरम्यान हा सर्व तिच्या पतीने स्वतःच व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. पण या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. पोलिसांचा पर्दाफाश करण्यासाठी हा व्हिडिओ केल्याचा दावा आता पीडित महिलेने आणि तिच्या पतीने केले आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केल्याने खळबळ माजली आहे. 

एका पोलिस कर्मचाऱ्याने केला लैंगिक अत्याच्यार - महिलेचा गंभीर आरोप

सदर महिलेने तिच्या पतीला जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. पारधी समाज जात पंचायतीच्या या अमानुष न्यायनिवाड्याचा प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यातील (osmanabad district) परंडा तालुक्यात (paranda taluka) घडला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नवऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार

दरम्यान सदर पीडित महिलेने गावातील एक व्यक्ती आणि परंडा पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याने संबंधित माझायावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात केला आहे. पीडित महिला आणि तिचा पती आता माध्यमांसमोर आले असून, त्यांनी त्यांची कैफियत मांडली आहे. सदर पोलीस कर्मचारी नवऱ्याला जेलमध्ये टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करत होता. असा धक्कादायक आरोप करण्यात आला असून,  कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कशी आहे चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा! नेमका प्रकार काय?

कांही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, तो व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजत नव्हते. मात्र सदर व्हिडीओ उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर व्हिडीओत पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला होता. अशावेळी या समाजातील जायपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली.

जर तिचा हात भाजला तर तिला चारित्र्यहीन असल्याचं जाहीर केलं जातं​

ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत ५ रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं. उकळत्या तेलातील नाणं बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध! जर तिचा हात भाजला तर तिला चारित्र्यहीन असल्याचं जाहीर केलं जातं! दरम्यान उकळत्या तेलातून नाणे काढण्यासाठी महिलेने हात देखील घातला मात्र, महिलेचा हात चांगलाच भाजला आहे. तेलात हात घालण्याअगोदर सदर महिला गयावया करत तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी बळजबरी केली. या परीक्षेत पास-नापास कसं ठरतं हा प्रश्न आपल्याला पडला असेल.

 

अद्यापपर्यंत गुन्हा दाखल नाही.

दरम्यान, सदर घटनेत अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र, सदर घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी