New voter registration programme महत्वाचे ! जिल्ह्यात एक नोव्हेंबरपासून नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम , असा करावा लागणार अर्ज

New voter registration programme from first november एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी १ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी प्रसिध्दी करण्यात येईल. दावे आणि  हरकती स्वीकारण्याचा कालावधी सोमवार १ नोव्हेंबर  ते मंगळवार ३० नोव्हेंबर २०२१ असा असेल.

New voter registration programme from first november
जिल्ह्यात एक नोव्हेंबरपासून नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे
  • मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना सहा चा अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रासह भरावा
  • २० डिसेंबर २०२१ पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे. 

New voter registration programme उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात एक नोव्हेंबर २०२१ पासून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिल्ली येथील भारत निडणूक आयोग आणि मुंबई येथील मुख्य निवडणूक अधिकारी यांनी एक जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्तं पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे एक नोव्हेंबर २०२१ पासून जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे त्याअनुषंगाने १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

२० डिसेंबर २०२१ पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे. 

एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी १ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) रोजी प्रसिध्दी करण्यात येईल. दावे आणि  हरकती स्वीकारण्याचा कालावधी सोमवार १ नोव्हेंबर  ते मंगळवार ३० नोव्हेंबर २०२१ असा असेल. तर विशेष कालावधी शनिवार १३ नोव्हेंबर आणि  रविवार  १४ नोव्हेंबर असेल. दिनांक २७ नोव्हेंबर आणि  २८ नोव्हेंबर २०२१ रोजी  दावे तसेच  हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. सोमवार २० डिसेंबर २०२१ पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे. 

मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना सहा चा अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रासह भरावा

दरम्यान, दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्ष पूर्ण होणा-या तरुण पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना सहा चा अर्ज (सोबत आवश्यक कागदपत्रासह ) आणि  ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नाव, पत्ता किंवा इतर दुरुस्ती असल्यास नमुना आठ चा अर्ज भरुन सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालयात  किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे पुराव्यासह जमा करण्याचे आवाहन येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. 

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे

तसेच ग्राम विकास विभागाच्या शासन परित्रक दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ प्रमाणे  मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी तसेच नवीन नोंदणी इत्यादी प्रकीया गावातील नागरिकांपर्यत सुलभतेने पोहोचण्याकरिता दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही  दिवेगावकर यांनी कळविले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी