ऑनलाइन शिक्षण नको देशी दारूचा परवाना हवा; विद्यार्थ्याचं उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना पत्र

No to online education interested in liquor license ; Student's letter to the Minister of Higher and Technical Education : 'ऑनलाइन शिक्षण नको दारू विक्रीचा परवाना हवा आहे' अशा स्वरुपाची मागणी करणारे पत्र एका विद्यार्थ्याने राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना पाठवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

student letter to higher and technical education minister
ऑनलाइन शिक्षण नको देशी दारूचा परवाना हवा; विद्यार्थ्याचं उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना पत्र  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ऑनलाइन शिक्षण नको देशी दारूचा परवाना हवा; विद्यार्थ्याचं उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना पत्र
  • विद्यार्थ्यांनाकडे चांगले मोबाइल नाहीत त्याबरोबर ग्रामीण भागात इंटरनेट सेवाही नीट नाही
  • सर्व नियमांचे पालन करून दारूचा व्यवसाय करेन, योग्य दरातच त्याची विक्री करेन – विध्यार्थी  

No to online education interested in liquor license ; Student's letter to the Minister of Higher and Technical Education : नांदेड : महाराष्ट्रात कोरोना संकटाचे कारण पुढे करुन वारंवार शाळा-कॉलेज बंद, ऑनलाइन शिक्षण सुरू, अभ्यासक्रमात कपात, सोप्या परीक्षा हे प्रकार सुरू आहेत. यामुळे शिक्षणाचं महत्त्व कमी झाल्याची भावना राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागली आहे. शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल सुरू असले तरी दारू विक्रीवर कोरोना संकटाचा विशेष परिणाम झालेला नाही. महसूल हवा म्हणून राज्य शासन दारू विक्री सुरू ठेवत आहे. या सर्व घडामोडींचा काही विद्यार्थ्यांवर भलताच परिणाम झाल्याचे चित्र आहे. 'ऑनलाइन शिक्षण नको दारू विक्रीचा परवाना हवा आहे' अशा स्वरुपाची मागणी करणारे पत्र एका विद्यार्थ्याने राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना पाठवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन ऑफलाइन शिक्षण घ्यायला परवानगी दिली जात नाही – विध्यार्थी

अजब मागणी करणाऱ्याचे नाव पवन जगडमवार असं आहे. पवन जगडमवार याने उच्च व तंत्रशिक्षणशिक्षणमंत्री उदय सामंत यांना दारू विक्रीचा परवाना देण्याची मागणी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्र पाठवून केली आहे. पवन जगडमवार हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात शिक्षण घेत आहे. करोना, ओमायक्रॉनचा प्रसार वाढत असल्याने राज्यातील शाळा, कॉलेज, विद्यापीठ बंद ठेऊन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. दारू दुकाने मात्र निर्धास्तपणे सुरू आहेत. करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात जाऊन ऑफलाइन शिक्षण घ्यायला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणापेक्षा देशी दारूचा परवाना मिळावा अशी मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.

विद्यार्थ्यांनाकडे चांगले मोबाइल नाहीत त्याबरोबर ग्रामीण भागात इंटरनेट सेवाही नीट नाही

विद्यार्थ्याने पत्रात पुढे म्हटलं आहे की, ऑनलाइन शिक्षणामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसानही होत आहे. त्याच कारण म्हणजे विद्यार्थ्यांनाकडे चांगले मोबाइल नाहीत. ग्रामीण भागात इंटरनेट सेवाही नीट नाही. अनेक ठिकाणी नेटवर्कच येत नाही. कधी लाईटच नसते. अशा स्थितीमध्ये शिक्षण कसे घ्यायचे?,” असा सवाल देखील जगडमवार याने उपस्थित केला आहे. 

सर्व नियमांचे पालन करून दारूचा व्यवसाय करेन, योग्य दरातच त्याची विक्री करेन – विध्यार्थी  

सर्व नियमांचे पालन करून दारूचा व्यवसाय करेन, योग्य दरातच त्याची विक्री करेन, असं देखील सदर विद्यार्थ्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात व बंदीत ज्या पद्धतीने दारूची विक्री केली जाते त्याचा दुरुपयोग करणार नाही,” कारण, राज्यात शिक्षणापेक्षा दारूला जास्त महत्वाचे स्थान प्राप्त झाले. असेही या विद्यार्थ्यांने पत्रात म्हटले आहे.ऑनलाइन शिक्षण शिकून तरी काय फायदा, कारण त्यात प्रात्यक्षिक ज्ञान काहीच मिळत नाही. त्यामुळे अशा शिक्षणापेक्षा दारूचा परवाना मिळाल्यास उपाशी मरणार नाही, असं पत्र पवन जगडमवार या विध्यार्थ्याने मंत्री उदय सामंत यांना लिहिले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी