Exclusive : "आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान एकाच घरात राहणार"

"Now the President and the Prime Minister will be in the same house " : दत्ता व कविता चौधरी जेव्हा या दोघांच्या दुसऱ्या मुलाची नामकरणाची वेळ आली तेव्हा चौधरी यांनी दुसऱ्या मुलाचे नाव पंतप्रधान ठेवण्याचा निर्णय घेतला. मुलाचे जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर येथील महानगरपालिकेतुन पंतप्रधान दत्ता चौधरी या नावाने जन्मप्रमाणपत्र घेणार आहेत.

"आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान एकाच कुटुंबात राहणार"   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोलापूर येथील महानगरपालिकेतुन पंतप्रधान दत्ता चौधरी या नावाने जन्मप्रमाणपत्र घेणार
  • १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले होते
  • भविष्यात त्या मुलांना राष्ट्रपती व पंतप्रधान करेल असा प्रण ही दत्ता चौधरी यांनी केला आहे

Now the President and the Prime Minister will be in the same house  । उस्मानाबाद  । बातमीच्या सुरुवातीलाचं आम्ही स्पष्ट करत आहोत की , वाचकांनी लावलेला अंदाज हा पूर्णपणे चुकला आहे. त्याचं कारण देखील तसंच आहे , इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रपतींच्या निवास्थानी जाणार नाहीत किंवा देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानी जाणार नाहीत. तर आपण म्हणालं घटना नेमकी काय आहे. तर, आम्ही तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. सध्याच्या युगात आपण बाळाचे नामकरण करत असताना आगळ्या - वेगळ्या स्वरुपाचं नामकरण करताना पाहतो. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात नेमकं वेगळ घडलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील दत्ता व कविता चौधरी यांनी मुलाचे "पंतप्रधान" असे नामकरण केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती आहे त्यामुळे आता राष्ट्रपती आणि  पंतप्रधान हे दोघे एकाच कुटुंबात राहणार आहेत.

सोलापूर येथील महानगरपालिकेतुन पंतप्रधान दत्ता चौधरी या नावाने जन्मप्रमाणपत्र घेणार

अलीकडच्या काळात राजकीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसह आधुनिक नावे बाळाला देण्यात येतात परंतु आता घटनात्मक दर्जा असलेल्या पदांची नावे देण्याची नवी पध्दत रुढ होऊ पाहत आहे याची प्रचिती दत्ता व कविता चौधरी याच्या कुटुंबातील नामकरण सोहळ्याने समोर आली आहे. दरम्यान, ग्रामीण भागात बाळांच्या नामकरणाचा पाळणा सोहळा करण्याची प्रथा जुनी आहे. पारंपारिक पद्धतीने महिला बाळाच्या कानात फुंकर मारुन नाव ठेवले जाते. मात्र, ही प्रथा देखील अलीकडच्या काळात कमी पहायला मिळत आहे.

१९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले होते

दत्ता व कविता चौधरी जेव्हा या दोघांच्या दुसऱ्या मुलाची नामकरणाची वेळ आली तेव्हा चौधरी यांनी दुसऱ्या मुलाचे नाव पंतप्रधान ठेवण्याचा निर्णय घेतला. मुलाचे जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर येथील महानगरपालिकेतुन पंतप्रधान दत्ता चौधरी या नावाने जन्मप्रमाणपत्र घेणार आहेत. चौधरी दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले होते. तसे आधार कार्ड ही यांनी बनविले आहे. तर १० नोव्हेंबर २०२१ रोजी जन्मलेल्या मुलाचे नाव पंतप्रधान ठेवले आहे.

 

भविष्यात त्या मुलांना राष्ट्रपती व पंतप्रधान करेल असा प्रण ही दत्ता चौधरी यांनी केला आहे

राजकीय रस्सीखेच होत असली तरी चौधरी कुटुंबात मात्र राष्ट्रपती व पंतप्रधान एका छताखाली एकत्र वाढणार आहेत. मुलाची नावे राष्ट्रपती आणि पंतप्रधान ठेवल्याने भविष्यात त्या मुलांना राष्ट्रपती व पंतप्रधान करेल असा प्रण ही दत्ता चौधरी यांनी केला आहे. घटनात्मक पदाची नावे ठेवण्याचा हा पायंडा आगामी काळात कायदेशीर पेच निर्माण करणाराही ठरू शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी