बीड : बीड जिल्ह्याततून बेपत्ता होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील ११ महिन्यामध्ये तब्बल ६९२ जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये प्रेमप्रकरणांतून धूम स्टाईल पलायन केलेल्या महिला- मुली अन् तरुण पुरुषांची संख्या अधिक आहे. तर , बेपत्ता होणाऱ्यामध्ये महिला आणि मुलींचे प्रमाण अधिक असून त्या तुलनेने पुरुषांची संख्या कमी आहे. बेपत्ता झालेले हे सर्व तरुण- तरुणी मोठमोठ्या शहरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या ११ महिन्यात नोव्हेंबर अखेर ४१९ महिला- मुली व २७३ तरुण मुले- पुरुष बेपत्ता झाले आहेत. तर यापैकी ५६३ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तर पलायनाची प्रेमप्रकरणासोबतच कौटुंबिक कलह, दारिद्र्य, व्यसनाधीनता आणि वाईट तरुण- तरुणींच्या कौटुंबिक संगत आहे. दरम्यान अद्याप ८३ महिला- मुली व ४६ तरुण मुले- पुरुष बेपत्ता झाले आहेत.
या कोरोना काळात म्हणजेचय २ वर्षांमध्ये खूप मानसिक तणाव प्रत्येक कुटुंबामध्ये, कुटुंबातील व्यक्तीवर आले आहे. त्यामुळे हे मानसिक दडपण दुर करण्यासाठी या ठिकाणी कुठेतरी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. मागील ११ महिन्यांत जवळपास सातशे जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्याच्या दप्तरीत आहे. यामध्ये अल्पवयीन मुलं- मुलींदेखील आहेत. आई- वडिलांशी (father) कमी असलेला संवाद, त्याचबरोबर मित्रांची मैत्रिणींची असलेली संगत ही महत्त्वाचे आहे.अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी दिली आहे.
किशोरवयीन वयामध्ये होणारे प्रेम, विभिन्न बदल आकर्षण वाटणे या गोष्टी पलायन होण्याला देखील कारणीभूत ठरू शकतात. आपले मन हे कुठे तरी मोकळ करणे गरजेचे आहे. जर मोकळे नाही झाले तर यातून विविध घटना घडण्याची संभावना असते. त्याचबरोबर परंतु, यासंदर्भात जर आपण त्या मुलांचे कौन्सलिंग नाही केले त्याचे समुपदेशन नाही केले तर त्यातून वाईट घटना घडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना समजून घेऊन योग्य समुपदेशन केले तर यावर नक्कीच आपण ब्रेक आणू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.