छापेमारीत इतका पैसा की पैसे मोजणारे अधिकारी पडले आजारी

Officials fell sick while counting money : आयकर विभागाच्या या छ्पेमारीत तब्बल ५८ कोटी रुपयाची रोकड मिळाली आहे. ही रोकड मोजण्यासाठी तब्बल १२ मशिन्स होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन पैसे मोजायला असून, देखील तब्बल १३ तासांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे. आयकर विभागाचे कर्मचारी छापेमारीत जमा झालेली रोकड नजीकच्या एसबीआय बँकेत नेऊन मोजत होते.

Officials fell sick while counting money
छापेमारीत इतका पैसा की पैसे मोजणारे अधिकारी पडले आजारी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • छापेमारीतील अनेक अधिकारी आजारी पडले
  • तब्बल ८ दिवसा चालली छापेमारी
  • पैसे मोजायला लागला १३ तासांपेक्षा जास्त कालावधी?

जालना : जालना येथे आयकर विभागाच्या तब्बल २६० अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात ५८ कोटी रुपयांची रोकड, ३२ किलो सोने, हिरे आणि इतर ऐवजाच मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी टाकलेल्या या छापेमारीतील अनेक अधिकारी आजारी पडले असल्याचे सुद्धा समोर आले आहे. कारण, सदर छापेमारी ही तब्बल ८ दिवस करण्यात आली आहे. १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान टाकण्यात आलेल्या या ८ दिवसांत गुप्तपणे सुरु असलेल्या या छापासत्रात आयकर खात्याला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती मिळाली आहे. दरम्यान, आयकर विभागाने टाकलेल्या या छापेमारीबाबत आयकर खात्याकडून प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. आयकर विभागाने १ ते ८ ऑगस्ट या कालावधीत जालना जिल्ह्यात रात्रंदिवस हे छापेमारी सुरु केली होते. या छापेमारीत आयकर विभागाला मोठ यश आलं आहे. आयकर विभागाच्या या मोहीमेत आयकर खात्याचे तब्बल २६० कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, आयकर खात्याकडून जालना जिल्ह्यातील स्टील व्यावसायिकांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांनी राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा : इन्कम टॅक्स रिफंडचा केला असेल दावा तर ठेवा हा पुरावा

तब्बल ३९०  कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या कारवाईत समोर आली

आयकर विभागाने टाकलेल्या या छाप्यात तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाच्या कारवाईत समोर आली असल्याचे बोलले जात आहे. तर या कारवाईसाठी एकूण आठ दिवसांचा कालावधी लागला असून, दिवस-रात्र अशी २४ तास कारवाई सुरु होती. सदर कारवाईनंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टील कारखान्यातून बेहिशेबी मालमत्ता औरंगाबादमध्ये आली. औरंगाबाद येथील काही केटरर्स, बांधकाम व्यावसायिक यांनी तो पैसा व्यवहारत आणला आणि कर बुडवला. त्यामुळे हे सर्वजण आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं समोर आल आहे.

अधिक वाचा : 'लाल सिंग चड्ढा'ने रिलीजपूर्वी कमावले तब्बल 12 कोटी 

पैसे मोजायला लागला १३ तासांपेक्षा जास्त कालावधी?

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या या छ्पेमारीत तब्बल ५८ कोटी रुपयाची रोकड मिळाली आहे. ही रोकड मोजण्यासाठी तब्बल १२ मशिन्स होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात मशीन पैसे मोजायला असून, देखील तब्बल १३ तासांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे. आयकर विभागाचे कर्मचारी छापेमारीत जमा झालेली रोकड नजीकच्या एसबीआय बँकेत नेऊन मोजत होते. त्यामुळे बँकेच्या टेबलांवर ठिकठिकाणी नोटांच्या बंडलांची थप्पी रचलेली दिसत होती.

अधिक वाचा : जालन्यात IT विभागाची छापेमारी,नोटांचे बंडल पाहून चक्रावून

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी