Omicron | मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव , एकाच दिवशी आढळले 'एवढे' रुग्ण, नवी नियमावली २७ डिसेंबर रोजी होणार जारी

omicron positive patient found in aurangabad: ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणाच्या वडिलांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते. ज्याचा रिपोर्ट आज आला असून, तरुणाचे वडील सुद्धा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहे

omicron positive patient found in aurangabad
मराठवाड्याच्या या जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शहरात एकाच दिवशी दोघांचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे
  • तरुणाच्या वडिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते
  • औरंगाबाद जिल्हा आणि शहरासाठी नवी नियमावली २७ डिसेंबर रोजी जारी केली जाईल

Omicron in Aurangabad | औरंगाबाद : कोरोनानंतर आता ओमिक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला असल्याचे पहायला मिळत आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग सर्वत्र पसरताना दिसतो आहे. मराठवाड्यात देखील ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याचं पहायला मिळालं आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद , बीडमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, ओमिक्रॉनचा आता औरंगाबाद जिल्ह्यात देखील शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे , औरंगाबादकर यांची चिंता वाढली असल्याचं दिसून येत आहे. आज आलेल्या अहवालात या दोन्ही व्यक्तींचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांचे स्वॅबचे नमूने पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबकडे पाठवण्यात आले होते.इंग्लंड आणि दुबईहून आलेल्या दोन व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, आता ओमिक्रॉनचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यामुळे मराठवाड्यात आतापर्यंत लातूर - १, उस्मानाबाद - ४ आणि आता औरंगाबादमध्ये - २ असे एकूण ७ ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत.

शहरात एकाच दिवशी दोघांचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे

दरम्यान, औरंगाबाद शहरात एकाच दिवशी दोघांचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दुसरा रुग्ण हा दुबईहून आलेला होता, त्याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते, ज्याचा ओमिक्रॉन रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. सदर घटनेमुळे औरंगाबाद शहरात खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी, औरंगाबाद येथील तरुण मुंबइत ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलं होता. त्यानंतर या तरुणांच्या कुटुंबातील व्यक्तींना खबरदारी म्हणून क्वारंटाइन करण्यात आले होते.

तरुणाच्या वडिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते

ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणाच्या वडिलांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते. ज्याचा रिपोर्ट आज आला असून, तरुणाचे वडील सुद्धा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहे. इंग्लंडहून आलेल्या तरुणाचे वडील ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली असतानाच आणखी एक जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

औरंगाबाद जिल्हा आणि शहरासाठी नवी नियमावली २७ डिसेंबर रोजी जारी केली जाईल

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ३० नोव्हेंबरपासून गर्दी नियंत्रणाबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी सुरु असली तरी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर वाढता धोका लक्षात घेता, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा आणि शहरासाठी नवी नियमावली २७  डिसेंबर रोजी जारी केली जाईल, असं जाहीर केलं आहे. 

औरंगाबादमध्ये सध्या हे नियम लागू आहेत?

१ ) लग्न समारंभातील उपस्थितीवर निर्बंध, रात्री 9 नंतर संचारबंदी असल्याने हॉटेलवर विविध बंधने


२) ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृह, चित्रपटगृह, मंगल कार्यालय, सभागृहात बंदिस्त जागेवर होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाचं परवानगी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी