मराठवाड्यातील उस्मानाबाद ,बीड ,औरंगाबादनंतर 'या' ओमिक्रॉनचे २ रुग्ण आढळले, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांपैकी दोघांना ओमिक्रॉनची लागण

omicron positive patient found in nanded : तिघांपैकी दोघे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती येथील आरोग्य विभागाने दिली आहे. खबरदारी म्हणून या तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते

 omicron positive patient found in nanded
उस्मानाबाद ,बीड ,औरंगाबादनंतर 'या' ओमिक्रॉनचे २ रुग्ण आढळले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नांदेड जिल्ह्यातदेखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे
  • खबरदारी म्हणून या तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
  • दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांपैकी दोन जणांना ओमिक्रॉनची लागण

नांदेड : राज्यात कोरोनानंतर आता ओमिक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला असल्याचे पहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याचं पहायला मिळालं आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद , बीडमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातदेखील ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. येथे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांपैकी दोन जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

खबरदारी म्हणून या तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार तिघांपैकी दोघे ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती येथील आरोग्य विभागाने दिली आहे. खबरदारी म्हणून या तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तसेच त्यांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. हे तिघे हिमायतनगर येथे मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून आले असल्याची माहिती आहे.

कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज

काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला ८ लाख डोसेस देत होतो, सध्या 5 लाख डोसेस दिवसाला दिले जातात. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले आहेत. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले.

शहरात एकाच दिवशी दोघांचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे

दरम्यान, औरंगाबाद शहरात एकाच दिवशी दोघांचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दुसरा रुग्ण हा दुबईहून आलेला होता, त्याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते, ज्याचा ओमिक्रॉन रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. सदर घटनेमुळे औरंगाबाद शहरात खळबळ उडाली असून, संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी, औरंगाबाद येथील तरुण मुंबइत ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलं होता. त्यानंतर या तरुणांच्या कुटुंबातील व्यक्तींना खबरदारी म्हणून क्वारंटाइन करण्यात आले होते. 

तरुणाच्या वडिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते

ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणाच्या वडिलांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते. ज्याचा रिपोर्ट आज आला असून, तरुणाचे वडील सुद्धा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहे. इंग्लंडहून आलेल्या तरुणाचे वडील ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली असतानाच आणखी एक जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी