Corona Stories । कोरोनाने घरातील एका व्यक्तीचा मृत्यू , पण ५० हजारच्या मदतीसाठी घरातूनच आले 'एवढे' अर्ज

one dies of corona four apply for 50 thousand rupees scheme : औरंगाबादमध्ये सदर घटना घडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मुलगा, मुलगी आणि दोन भावांनी स्वतंत्र अर्ज केले आहेत. त्यामुळे पालिकाही संभ्रमात पडली आहे आहे. 

one dies of corona four apply for 50 thousand rupees scheme
कोरोनाने मृत्यू ,५० हजारच्या मदतीसाठी 'एवढे' आले अर्ज   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एकाचं व्यक्तीच्या मृत्यूनंतर ५० हजार रुपयासाठी तब्बल ४ अर्ज
  • अर्ज केल्यानंतर माहितीची खातरजमा करून मृताच्या कुटुंबाला ५० हजार रूपये  मिळतात
  • मृत्यू झालेल्या व्यक्तींपेक्षा 3660 जास्तीचे अर्ज

औरंगाबाद : जर कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर त्याला ५० हजार रुपयाची मदत राज्य सरकार कडून दिली जात आहे. मात्र, ही मदत आता नेमकं कोणाच्या हातात द्यावी असा प्रश्न आता सरकारी अधिकाऱ्यांना पडला आहे. कारण, कोरोनामुळे एका व्यक्तीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला असून, एकाचं व्यक्तीच्या मृत्यूनंतर ५० हजार रुपये आपल्याला मिळावे यासाठी कुटुंबातील एक – दोन नव्हे तर तब्बल ४ सदस्यांनी वेगवेगळे अर्ज केले आहेत. त्यामुळे कोणाचा अर्ज ग्राह्य धरून मदत करायची असा प्रश्न पालिकेसमोर पडला आहे. ५० हजारांच्या मदतीसाठी मृताचा मुलगा, मुलगी आणि दोन भावांनी स्वतंत्र अर्ज केले आहेत. त्यामुळे, आता कोणाचा अर्ज ग्राह्य धरला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (one dies of corona four apply for 50 thousand rupees scheme Corona News in marathi )

अर्ज केल्यानंतर माहितीची खातरजमा करून मृताच्या कुटुंबाला ५० हजार रूपये  मिळतात

दरम्यान, औरंगाबादमध्ये सदर घटना घडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा मुलगा, मुलगी आणि दोन भावांनी स्वतंत्र अर्ज केले आहेत. त्यामुळे पालिकाही संभ्रमात पडली आहे आहे.  कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रूपये मदत म्हणून दिले जातात. ही रक्कम मिळवण्यासाठी मृताच्या कुटुंबाने कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर माहितीची खातरजमा करून मृताच्या कुटुंबाला ५० हजार रूपये  मिळतात. मात्र, आता एकाच कुटुंबातील एवढ्या सदस्यांनी अर्ज केल्याने पालिकेतील अधिकारी यांनी मात्र डोक्याला हात लावला आहे.

 

मृत्यू झालेल्या व्यक्तींपेक्षा 3660 जास्तीचे अर्ज

औरंगाबादमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींपेक्षा ३६६० जास्तीचे अर्ज आले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासन देखील मोठ्या संकटात सापडले आहे की, नेमका कोणत्या व्यक्तीचा अर्ज ग्राह्य धरून त्या व्यक्तीला ५० हजार रुपयाची रक्कम मदत म्हणून द्यावी असा प्रश्न पालिकेला पडला आहे. 
दरम्यान, आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार ९८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु, 50 हजार रूपयांच्या सरकारी मदतीसाठी तब्बल ५ हजार ३४ अर्ज पालिकेकडे दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी