बापरे! तुळजापूर मंदिराची बोगस वेबसाईट, आतापर्यंत अनेकांना गंडा , जिल्हाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश

महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानात घोटाळा होणे किंवा लुट होणे ही काय नवीन गोष्ट नाही. मात्र, यावेळी झालेला घोटाळा ऑनलाईन पद्धतीने झाला आहे.

online fraud fake tuljapur mandir website online fraud fake tuljapur temple website
बापरे! तुळजापूर मंदिराची बोगस वेबसाईट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आर्थिक घोटाळ्यात कोण कोण गुंतलंय याचा शोध घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे
  • मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत
  • जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानात घोटाळा होणे किंवा लुट होणे ही काय नवीन गोष्ट नाही. मात्र, यावेळी झालेला घोटाळा ऑनलाईन पद्धतीने झाला आहे. मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक करत आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर, प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. online fraud fake tuljapur mandir website online fraud fake tuljapur temple website

नेमकं काय म्हटलं आहे निवेदनात?

माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर ची अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org/ आहे. मात्र कुणी तरी अज्ञात लोकांनी https://www.tuljabhavani.in/ ही वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट सुरु केली आहे.

मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत

मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत आणि त्यांची लूट केली जात आहे. या वेबसाइटवर कुणाचाही नंबर नाही. तर, वेबसाइटवर क्लिक केले असता  पूजा प्रसाद सेवा ही कॅटेगिरी दिली आहे. त्यावर क्लिक केले की, अभिषेक, अलंकार महापूजा, खण - नारळ ओटी पूजा, जागरण गोंधळ, अन्नदान अश्या पूजा येतात. त्यानंतर पे फॉर प्रसाद सेवा म्हणून ऑप्शन येते, त्यावर क्लिक केले की, फोन नंबर मागितला जातो, आणि नंतर फॉर्म भरून पैसे वसूल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.    

आर्थिक घोटाळ्यात कोण कोण गुंतलंय याचा शोध घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावे

दरम्यान , या आर्थिक घोटाळ्यात कोण कोण गुंतलंय याचा शोध घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही सुभेदार यांनी केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी