तुळजाभवानीचे मंदीर उघडा, मुस्लिम महिलांचा पुढाकार

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Oct 13, 2020 | 21:42 IST

Open Tulja Bhavani Temple, an initiative of Muslim women: तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात मुस्लीम महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या .

Open Tulja Bhavani Temple, an initiative of Muslim women
तुळजाभवानीचे मंदीर उघडा, मुस्लिम महिलांचा पुढाकार  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • अनेकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून
  • मंदिरे उघडण्यासाठी मुस्लीम महिलांचा पुढाकार

उस्मानाबाद- मंदिरे खुली (open temple) करण्याच्या मागणीसाठी भाजपसोबत (bjp) आता तुळजापूर शहरातील (tuljapur city) मुस्लिम महिलांनी (muslim women) देखील पुढाकार घेतला आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर (tuljabhavani temple open) उघडण्यासाठी आज भाजपच्या महिला पदाधिकारी यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे.  मंदिर बंद उघडले बार,उद्धवा अजब तुझे सरकार, अशी घोणाबाजी करत महिलांनी तुळजापूर परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात भाजपाच्या पदाधिकारी महीलांबरोबराच स्थानिक व्यापारी, .मंदिरातील पुजारी आणि गृहणी महिलांनी सहभाग घेतला होता. मंदिर बंद असल्याने मंदिरावराती अवलंबून असलेले स्थानिक लोकांचे लहान मोठे उद्योग व्यवसाय ठप्प  झाले आहेत. यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचे व्यवसाय येथे चालतात त्याच बरोबर शारदीय नवरात्रोत्सव मध्ये शहराची आर्थिक उलाढाल चालते मात्र मंदिरे बंद असल्याने यांचे व्यवसाय बंद पडले आहेत. हे आंदोलन महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आंदोलनात सरकारचा निषेध करत सरकारने जर मंदिर उघडली नाहीत या पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप च्या पद्धधिकारी यांनी दिला आहे.

अनेकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून

भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही दिवसांपूर्वी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळेस देखील तातडीने मंदिर , मस्जिद किंवा चर्च असेल किवाइतर प्रार्थना स्थळ उघडी केली तर सामान्य लोकांची खूप मोठी उपजीविका या मंदिरावर आधारित असते. दरम्यान तुळजाभवानी मंदिरासमोर हिंदू मुस्लीम समाजातील लोकांची अनेक दुकाने आहेत. त्यावर ते लोकं आपले पोटाची भूक भागवतात. त्यामुळे लवकरात लवकर मंदिरे उघडी करावीत नाहीतर भारतीय जनता पार्टी तुम्हाला 'सळो कि पळो' केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

मंदिरे उघडण्यासाठी मुस्लीम महिलांचा पुढाकार

दरम्यान तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात मुस्लीम महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. त्यांचे म्हणणे होते कि, सरकारने मंदिरे लवकरात लवकर खुली करून द्यावी. कारण मंदिरे बंद असल्यामुळे त्यांना त्यांचे पोट भागवणे कठीण चालले आहे. दरम्यान मंदिरे जर लवकरात लवकर खुली करण्यात आली नाहीत तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

मंदिर उघडण्यासाठी राज्यभर आंदोलन 

दरम्यान मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलनं आणि लाक्षणिक उपोषण केली जात आहेत. मुंबईत सिद्धीविनायक मंदिराच्याबाहेर भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी