अखेर! भाजपच्या 'या' आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Order to file a case of robbery against MLA Suresh Dhas : माधुरी चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, सुरेश धस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनलविरोधात माधुरी चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. याचाच राग मनात धरून यांच्या कार्यकर्त्यांनी माधुरी चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांना मानसिक त्रास दिला

Order to file a case of robbery against MLA Suresh Dhas
भाजपच्या 'या' आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत मोठी वाढ
  • ८ महिन्यांपूर्वी सुरेश धस यांच्यावर दाखल झाला होता गुन्हा
  • १९ जुलै रोजी धस आणि त्यांच्या समर्थकांनी चौधरी यांचे घर आणि हॉटेलची तोडफोड केली?

बीड : भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण, धस यांच्यावर ८ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात दरोड्याचा कलम वाढवण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (aurangabad High court ) दिले आहेत. यामुळे सुरेश धस अडचणीत आले आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या या आदेशाने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, धस यांच्यासह ३८ जणांवर दरोडा ३९५, बेकायदा घरात घुसने ४४८, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे ४५३, यासह शांतता भंग करणे आणि इतर ३४१, ५०४, ५०६ ही कलमे  वाढणार आहेत.

अधिक वाचा : या 3 गाड्यांची भारतात आहे धूम...जबरदस्त मायलेज, तुफान फीचर्स

८ महिन्यांपूर्वी सुरेश धस यांच्यावर दाखल झाला होता गुन्हा

मनोज चौधरी आणि त्यांच्या पत्नी, माधुरी चौधरी सुरेश धस यांच्यासह ३८ जणांवर गंभीर आरोप करत पोलिसात फिर्याद दाखल केली होती. सदर दाम्पत्यान पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं होत की, भाजप आमदार धस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले. यावरून ८  महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह ३८ जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी धस यांच्यासह ३८ जणांवर १४३, १४७, १४८, १४९, ४२७, ३३६ आणि ३७९ ही कलमे लावली होती. त्यांनतर फिर्यादी चौधरी यांनी कलमात वाढ करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल केली. त्यांनतर आता कलमांत वाढ करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या या आदेशामुळे सुरेश धस मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

अधिक वाचा : पहिल्यांदा जेव्हा कोणत्याही कंपनीसाठी‘टाटा’नाव वापरण्यात आले 

१९ जुलै रोजी धस आणि त्यांच्या समर्थकांनी चौधरी यांचे घर आणि हॉटेलची तोडफोड केली?

दरम्यान, माधुरी चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, सुरेश धस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरेश धस यांच्या पॅनलविरोधात माधुरी चौधरी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. याचाच राग मनात धरून यांच्या कार्यकर्त्यांनी माधुरी चौधरी यांचे पती मनोज चौधरी यांना मानसिक त्रास दिला असून, धस आणि त्यांच्या समर्थकांनी १९ जुलै रोजी चौधरी यांचे घर आणि हॉटेलची तोडफोड केली, असा आरोप सुरेश धस यांच्यावर माधुरी चौधरी यांनी केला आहे.

अधिक वाचा : मोहरी तेल आणि रिफाइंड तेलाच्या दरात घसरण, काय आहे नवीन दर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी