'या' महिला जिल्हाधिकाऱ्यांनी बांधली वृक्षाला राखी

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Aug 03, 2020 | 21:23 IST

Rakhi of a tree built by a woman collector: उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी मात्र वृक्षाला राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे.

Rakhi of a tree built by a woman collector
'या' महिला जिल्हाधिकाऱ्यांनी बांधली वृक्षाला राखी   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी वृक्षाला राखी बांधून निसर्ग प्रेम केले व्यक्त
  • खासदार सुप्रिया सुळेंनी बांधली अजित पवारांना राखी
  • कोरोना योध्यांसोबत केला रोहित पवारांनी रक्षाबंधन सण साजरा

उस्मानाबाद: राखी पौर्णिमेचा (rakshabandhan) सण हा भाऊ बहिणीतील नातं अतूट करणारा सण आहे. राखी पौर्णिमेच्या सणा दिवशी बहिण (sister) आपल्या भावाला (brother) राखी बांधून ओवाळणी करते. अशा प्रकारचा हा सण आहे. मात्र या सणादिवशी उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी मात्र वृक्षाला राखी बांधून हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे (collector deepa mudhol munde) यांनी वृक्षाला राखी बांधून साजरी केलेल्या सणाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

वृक्षाला राखी बांधून निसर्ग प्रेम केले व्यक्त

दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी वृक्षाला राखी बांधत झाडाची रक्षा तसेच वृक्ष संवर्धन करणार असल्याचा एक संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.

कोरोना योध्यांसोबत केला रोहित पवारांनी रक्षाबंधन सण साजरा

आमदार रोहित पवार हे सतत कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत असतात. आज मात्र ते एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहेत. ते कारण म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी रोहित पवार (rohit pawar) यांनी पुण्यातील ससून येथील महिला कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे. त्यामुळे रुगालायातील कर्मचारी हे चांगलेच भावूक झाले होते. ससून रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी आमदार रोहित पवार याना राखी बांधत औक्षण केल आहे.

रोहित पवारांकडून सॅनिटायझर आणि मास्कची ओवाळणी

रोहित पवार यांना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी राखी बांधल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांना ओवाळणी स्वरूपात मास्क आणि सॅनिटायझर दिले आहे.त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याचा देखील विश्वास दिला आहे

.

खासदार सुप्रिया सुळेंनी बांधली अजित पवारांना राखी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांना राखी बांधत रक्षाबंधनाचा सण उत्साहात्त साजरा केला आहे. दरम्यान सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे दोघे दरवर्षी हा सण साजरा करत असतात.

पुण्यात रेड लाईट भागातील महिलांसोबत रक्षाबंधन

पुणे येथे बुधवार पेठ भागात मोठा रेड लाईट एरिया आहे.या भागातील महिलांसोबत देखील काही संस्थानी रक्षाबंधनाचा सण साजरा करून, सामजिक बांधिलकी जपली आहे. दरम्यान हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक महिलांनी देखील सहभाग घेतला होता. कार्यक्रमात आलेल्या महिलांनी कोरोनाच्या परस्थितीचे भान ठेवत सोशल डिस्टन्सीगचे पालन करत मास्कचा देखील वापर केला गेला होता. दरम्यान महिलांनी राख्या बांधत पारंपारिक पद्धतीने औक्षण देखील केले.

मदत करण्याच्या हेतूने घेतला रक्षाबंधनाचा कार्यक्रम

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीत या महिलांना उपासमारीचा देखील सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यापासून शहरात लॉकडाऊनची स्थिती असल्याने, या महिलांना जीवनावश्यक वस्तूसह अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या देखील हीच परिस्थिती असल्याने मदत करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम घेतला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी