कोरोना बाधित तरुणाने मृत्युपूर्वी केलेल्या व्हिडिओतील आरोपाने राज्यात खळबळ

Corona Positive made the video before his death: उस्मानाबाद येथे कोरोना बाधित रुग्णाने मृत्युपूर्वी एक व्हिडिओ शूट केला असून या व्हिडिओत तरुणाने गंभीर आरोप केले आहेत.

Corona Positive made the video before his death, causing a stir in the state
कोरोनाबाधित तरुणाने मृत्यूपूर्वी केला व्हिडीओ, राज्यात खळबळ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कथित व्हिडिओतील रुग्णाने केलेल्या आरोपामुळे राज्यात खळबळ
  • रात्रीचे ऑक्सिजन बंद करतात, रुग्णाने केला आरोप
  • जिल्हा शल्य चिकित्सकांनी आरोप फेटाळले

उस्मानाबाद: उस्मानाबाद (osmanabad) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक कथित व्हिडिओ (vidio) टाइम्स नाऊ च्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये कोरोना बाधित (corona positive) असलेल्या रुग्णाने रुग्णालयावर (hospital) गंभीर आरोप केले असून, या व्हिडिओमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दरम्यान व्हिडिओतील तरुणाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोना बाधित या तरुणावर उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.  

मृत्युपूर्वी काय म्हणाला रुग्ण?

या कथित व्हिडिओमध्ये रुग्णाने गंभीर आरोप केले आहेत. मृत्युपूर्वी (before death) रुग्ण व्हिडिओमध्ये सांगत आहे की, मी उस्मानाबाद जिल्ह्यातील आसू गावचा रहिवासी असून, मी कुठेही गेलेलो नाही. तरीदेखील मला कोरोनाची लागण झाली असून, मी उस्मानाबाद येथे कोविड १९ वर उपचार घेत आहे. तरी माझे हातपाय गळाटून दम भरत आहे. इथ डॉक्टर इलाज करतात मात्र थोडा उशीर लागत आहे.

रात्रीचे ऑक्सिजन बंद करतात?

दरम्यान कथित व्हिडिओमध्ये रुग्णाने मोठा आरोप करत रात्री ऑक्सिजन बंद करतात अस म्हंटलं असून रात्री डॉक्टर (doctor) देखील नसतात असा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान रुग्णाला मोठ्या प्रमाणात धापा भरत होत्या. रुग्ण म्हणत होता की, धापा आणि हातापायाचा इलाज झाला तर चांगले होईल. या सर्व गोष्टी कलेक्टर साहेबांना सांगा असही त्याने व्हिडिओ म्हटल आहे.

 जिल्हा शल्य चिकित्सकांनी आरोप फेटाळले

या सर्व घटनेवर आमचे प्रतिनिधी अजहर शेख यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना फोनद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी कथित व्हिडिओमध्ये एका रुग्णाने मृत्युपूर्वी केलेले सर्व आरोप हे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक म्हणाले की, आपल्याकडे सर्व सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, ऑक्सिजन बंद करण्याचा प्रश्नच येत नाही.

अतिशय दुर्दैवी घटना- आमदार राणाजगजितसिंह पाटील

दरम्यान सदर घडलेली घटना अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि संबधित डॉक्टरांसोबत माझी चर्चा झाली आहे. सदर घटनेच्या चौकशीची देखील मागणी केली आहे. सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. त्याचबरोबर जिथे कोव्हीडच्या रुग्णाचा इलाज होतो त्या ठिकाणी सीसीटीव्ही तातडीने बसवून घ्यावेत. अशी प्रतिक्रिया आमदार पाटील यांनी आमचे प्रतिनिधी अजहर शेख यांना दिली आहे.

कोरोना परस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी- आमदार ठाकूर

आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मात्र सरकार वर गंभीर आरोप करत सरकार कोरोनाची परस्थिती हाताळण्यास अपयशी ठरले असून, हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार आहे. सदर रुग्णाचा मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जर झाला असेल, तर त्या संबंधी निश्चितच चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूंची संख्या वाढत चालली आहे. यावर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे अस सुजितसिंह ठाकूर म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी