gramapanchayat by election 'या' जिल्ह्यातील ११९ ग्रामपंचायतीमधील १७९ पदांसाठी पोटनिवडणूक होणार

osmanabad district gramapanchayat by election : उस्मानाबाद जिल्ह्यात ११९ ग्रामपंचायतीमधील १७९ पदे विविध कारणांमुळे रिक्त आहेत. दिनांक १८/०२/२०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी खालील बाबींची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुक कार्यक्रम राबविण्यासाठी आदेशित करण्यात आला आहे.

osmanabad district gramapanchayat by election
'या' जिल्ह्यातील ११९ ग्रामपंचायतीमधील १७९ पदांसाठी पोटनिवडणूक होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उस्मानाबाद जिल्ह्यात ११९ ग्रामपंचायतीमधील १७९ पदे विविध कारणांमुळे रिक्त आहेत
  • निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक
  • तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक २२/११/२०२१ (सोमवार) पर्यंत असणार आहे.

gramapanchayat by election  उस्मानाबाद -   निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्याबाबत आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात ११९ ग्रामपंचायतीमधील १७९ पदे विविध कारणांमुळे रिक्त आहेत. दिनांक १८/०२/२०२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी खालील बाबींची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुक कार्यक्रम राबविण्यासाठी आदेशित करण्यात आला आहे.

१. ज्या ग्रामपंचायतीमध्ये कोवीड अॅक्टीव्ह रुग्ण संख्या नगण्य आहे.

२. ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपण्यास सहा महिन्याचा पेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. अश्याच ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या पदावर पोटनिवडणुका होणार आहेत.

असे आहेत निवडणुकीचे टप्पे

 १ ) नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त  जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा दिनांक २२/११/२०२१ (सोमवार) पर्यंत असणार आहे.

२ ) त्याचबरोबर तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक २२/११/२०२१ (सोमवार) पर्यंत असणार आहे.

३ ) नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ३०/११/२०२१ (मंगळवार) ते दिनांक ०६/१२/२०२१ (सोमवार) वेळ सकाळी ११.०० ते दु. ३.०० पर्यंत असणार आहे.

४ ) नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी )दिनांक ०७/१२/२०२१ (मंगळवार) वेळ सकाळी ११.०० वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत असणार आहे. 

५ ) नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) दिनांक ०९/१२/२०२१ ( गुरुवार) दुपारी ३.०० वा. पर्यंत

६ ) निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ दिनांक ०९/१२/२०२१ ( गुरुवार) दुपारी ३.०० वा. नंतर आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी