'या' जिल्ह्याचा समावेश लेवल ३ मध्ये पूर्वी लागू असलेले नियम व निर्बंध कायम

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 11, 2021 | 22:17 IST

Osmanabad district included in Level 3 :आयसीयू व्हेंटिलेटर बेड हे १० वापरात असुन १८६ बेड रिक्त आहेत, ऑक्सिजन बेड पैकी १०५ हे वापरात आहेत तर १ हजार १८५ बेड रिक्त आहेत. ऑक्सिजन बेड हे ९५ वापरात असून ९९९ रिक्त आहे

Osmanabad district included in Level 3
'या' जिल्ह्याचा समावेश लेवल ३ मध्ये पूर्वीचे नियम कायम   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात २० हजार १६८ रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली
  • अत्यावश्यक सेवा व वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद
  • अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये वैद्यकीय सेवा २४ तास सुरु राहतील. 

उस्मानाबाद: कोरोना रुग्णांची संख्या व चाचणीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad District) कमालीचे कमी झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश लेवल 3 मध्ये असुन पूर्वी लागू असलेले नियम व निर्बंध कायम असतील असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर (collector kaustubh Divegavakar) यांनी काढले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना (corona) चाचणीत रुग्ण सापडण्याचा पॉझिटिव्हीटी दर हा ५.१६ टक्के आहे तर ८.१३ टक्के ऑक्सिजन बेड वापर आहे.

आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात २० हजार १६८ रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली

गेल्या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात २० हजार १६८ रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात १ हजार ४१ रुग्ण म्हणजे ५.१६ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आयसीयू व्हेंटिलेटर बेड हे १० वापरात असुन १८६ बेड रिक्त आहेत, ऑक्सिजन बेड पैकी १०५ हे वापरात आहेत तर १ हजार १८५ बेड रिक्त आहेत. ऑक्सिजन बेड हे ९५ वापरात असून ९९९ रिक्त आहेत. जिल्ह्यात केवळ ८.१३ टक्के बेड वापरात आहेत त्यामुळे उस्मानाबादचा समावेश लेवल ३ मध्ये करण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवा व वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद

लेवल ३ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश असल्याने नियम व निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा व वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद राहणार आहेत. हॉटेल रेस्टोरेंट, खानावळ व उपहारगृह यांना मात्र शनिवारी व रविवारी घरपोच सेवा देता येणार आहे. सांयकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी तर त्यानंतर संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेली किराणा दुकाने व भाजीपाला फळ,बेकरी व कृषी विषयक दुकाने शनिवारी व रविवारी सुरु राहतील तर इतर दुकाने ही २ दिवस बंद राहतील. रविवारी जनता कर्फ्यु नसणार आहे मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहतील आणि जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू राहतील. वैद्यकीय सेवा, दवाखाने, लसीकरण सेवा २४ तास सुरु राहतील.सर्व दुकाने , आस्थापना व खासगी आस्थापनाची कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील.

अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये वैद्यकीय सेवा २४ तास सुरु राहतील. 

अत्यावश्यक सेवा व वस्तूंची दुकाने आणि व्यवसाय दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील तर या सेवा वगळता इतर दुकाने व आस्थापना हे शनिवारी व रविवारी बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये वैद्यकीय सेवा २४ तास सुरु राहतील. तर सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, बाग व उद्यान, क्रीडा दररोज सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील तर जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा व वेलनेस क्लब हे दररोज सांयकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील असे आदेशित केले आहे त्यामुळे यासेवा शनिवारी व रविवारीही सुरू राहतील.

या आस्थापना दररोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सुरु राहतील

अत्यावश्यक सेवेत पशुवैद्यकीय सेवा व खाद्याची दुकाने, वन विभागाने जाहीर केलेली कामे, सर्व किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेते, दूध संकलन व वितरण केंद्र आणि बेकरी,मिठाई, चिकन, मटण, पोल्ट्री, मासे व अंडी विक्री हि खाद्यपदार्थाची दुकाने, शीतगृहे व वखार, सार्वजनिक वाहतूक, स्थानिक प्राधिकरण व विभागाची सर्व मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे, रिझर्व्ह बँकेने अत्यावश्यक म्हणून निर्देशित केलेल्या सेवा,पाणीपुरवठा व कृषी विषयक उपक्रम व अवजारे, बियाणे, खते, उपकरणे व दुरुस्तीची दुकाने, आयात- निर्यात विषयक सर्व सुविधा, ई वाणिज्य सेवा, मान्यता प्राप्त प्रसार माध्यमे,पेट्रोल पंप, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा, एटीएम, पोस्ट विभागाच्या सेवा, आगामी पावसाळा ऋतूच्या अनुषंगाने आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग यांचा समावेश आहे. या आस्थापना दररोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सुरु राहतील असे आदेशित आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी