शिवसेनेला जोरदार धक्का, राष्ट्रवादीला भाजपचा पाठिंबा 

औरंगाबाद
Updated Dec 31, 2019 | 17:58 IST | अजहर शेख 

उस्मानाबाद नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने हात मिळवणी करून अभय उर्फ आबा इंगळे यांना विजयी करून उपनगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पाडली. 

osmanabad ncp shiv sena bjp municipal council deputy president  political news in marathi google newsstand
शिवसेनेला जोरदार धक्का, राष्ट्रवादीला भाजपचा पाठिंबा   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • महाविकास आघाडी येण्याच्या पूर्वीचे समीकरण उस्मानाबाद जुळले
  • उस्मानाबाद नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली.
  • या निवडणुकीत एक वेगळेच समिकरण पाहायला मिळाले.

उस्मानाबाद : उस्मानाबाद नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली.  या निवडणुकीत एक वेगळेच समिकरण पाहायला मिळाले. या निवडणुकीत राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेत येण्यापूर्वी ८० तासांचा प्रयोग झाला होता. तसाच प्रयोग पाहायला मिळाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने हात मिळवणी करून अभय उर्फ आबा इंगळे यांना विजयी करून उपनगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पाडली. 

उस्मानाबाद  नगरपालिकेत एकूण ३९ सदस्य आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीचे १८ ( एक अपक्ष ), शिवसेनेचे ११, भाजप ८ आणि काँग्रेस २ असे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी २, काँग्रेस २  आणि भाजपचा १ अशा पाच सदस्यांनी शिवसेनेच्या उमेदवारास मतदान केल्याचे केल्याचे उघड झाले. शिवसेनेचे एकूण सदस्य ११ असले तरी नगराध्यक्ष शिवसेनेचे असल्याने एकूण सदस्य संख्या १२ आहे.

या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी-भाजपकडून  राष्ट्रवादी काँग्रेसचे अभय इंगळे तर शिवसेनेकडून राजाभाऊ उर्फ सचिन पवार यांनी अर्ज दाखल केला होता, इंगळे यांना २३ तर पवार यांना १७ मते पडली.

 महाराष्ट्रभरात महाविकास आघाडी येण्याअगोदर अनेक जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप या दोघांची मिळून सत्ता स्थापन झाली आहे उस्मानाबादमध्ये देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप मिळून सत्ता स्थापन करण्यात आली होती. मात्र 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपाला एकट पाडत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिघा पक्षांनी मिळून महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना केली.  मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी भाजप आणि अजित पवार यांच्या समर्थनाने स्थापन झालेल्या सरकारच्या प्रयोगाची पुनरावृत्ती झाली आहे.  उस्मानाबादमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हे समिकरण पाहायला मिळाले.  त्यामुळे नगर पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांचं वर्चस्व दिसून आले आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी