सुप्रिया सुळेंच्या मागे ठामपणे उभे राहण्याऐवजी पंकजा मुंडे यांनी दिला मीडियालाचं सल्ला

Pankaja Munde advised the media ; सदर प्रकरणावर बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, हे प्रकरण अत्यंत साधं असून त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. तर अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जेव्हा पत्रकारांनी पंकजा यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की, राजकारणाची पातळी घसरु नये याची काळजी सर्वांनी घेणं आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं महिलांबाबत असं वक्तव्य करु नये.

Pankaja Munde advised the media
सुळेंच्या मागे ठामपणे उभे राहण्याऐवजी मुंडेंनी दिला मीडियाल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली
  • सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना सत्तार यांची जीभ घसरली
  • हे प्रकरण अत्यंत साधं असून त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही - पंकजा मुंडे

औरंगाबाद  : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांच्याबद्दल बोलताना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली असून, सत्तार यांनी  पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्त्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य करताना अभद्र भाषेचा वापर करत 'भिकारXX' असा शब्द वापरला आहे. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वापरलेल्या या शब्दामुळे राज्यातील वातावरण मोठ्या प्रमाणात तापले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, एका महिला खासदारांबाबत खालच्या पातळीत जबाबदार व्यक्ती शब्द वापरत असेल तर त्या महिला खासदाराच्यामागे खंबीरपणे उभे रहायचे सोडून  भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी या प्रकरणावर थेट पडदा टाकण्याचं काम केलं आहे. मंत्रीमहोदयांना कडक शब्दात समज देण्याऐवजी पंकजा मुंडे यांनी मीडियालाच या प्रकरणाचं भांडवल न करण्याचा सल्ला देऊन टाकला आहे.

अधिक वाचा ; देव दिवाळीसाठी 10 लाख दिवे, 50 टन फुलं अशी जय्यत तयारी

हे प्रकरण अत्यंत साधं असून त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

दरम्यान, सदर प्रकरणावर बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, हे प्रकरण अत्यंत साधं असून त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. तर अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जेव्हा पत्रकारांनी पंकजा यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की, राजकारणाची पातळी घसरु नये याची काळजी सर्वांनी घेणं आवश्यक आहे. कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं महिलांबाबत असं वक्तव्य करु नये. जर टीका करण्याची पातळी घसरत असेल तर ते अयोग्य आहे. एखादा व्यक्ती जे बोलतो, त्या बोलण्याचं भांडवल न करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. कोणीही किंवा मीडियानेही या प्रकरणाचे भांडवल करु नये, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी  म्हटलं आहे.

अधिक वाचा ; मारुतीच्या 30 किमी मायलेज देणाऱ्या 3 नवीन स्वस्त सीएनजी कार 

राष्ट्रवादीने सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शब्द मागे घेण्यासाठी २४ तासांचा अस्टीमेटम दिला आहे

सत्तार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेचा वापर केला आहे. सत्तार यांनी सुळे यांच्याबद्दल केलेल्या गलिच्छ शब्दामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, सत्तारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमालीचा आक्रमक झाला असून मुंबईतील सत्तारांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केलं. यावेळी सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शब्द मागे घेण्यासाठी 24 तासांचा अस्टीमेटम देण्यात आला आहे.

अधिक वाचा ; वेगळ्या ग्रहावरून आलाय हा खेळाडू, PAK क्रिकेटरने केली कमेंट

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी