जशास तसे उत्तर देणार, पंकजा मुंडेंचा इशारा

Pankaja Munde comment on Dhananjay Munde : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

Pankaja Munde comment on Dhananjay Munde
जशास तसे उत्तर देणार, पंकजा मुंडेंचा इशारा 
थोडं पण कामाचं
  • जशास तसे उत्तर देणार, पंकजा मुंडेंचा इशारा
  • पंकजा मुंडेंचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला
  • कोणाची पतंग किती उडू द्यायची हे ठरविण्यासाठी मतदार सक्षम - पंकजा मुंडे

Pankaja Munde comment on Dhananjay Munde : बीड : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. जिल्हातील सरकारी कामं, विकास योजना यावर विरोधक म्हणून प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. पालकमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित आहे. पण ते उत्तर देण्याऐवजी भलतंच बोलून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहे; असे पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या.

विरोधकांच्या प्रश्नांना बगल देऊन वेगवेगळी वक्तव्य करुन बातमीत राहता येईल. पण बीडच्या मतदाराला खरं-खोटं लगेच लक्षात येईल. जिल्ह्यातील मतदार हुशार आहे. तो कोण काय करत आहे हे लगेच ओळखतो. कोणाची पतंग किती उडू द्यायची हे ठरविण्यासाठी मतदार सक्षम असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे प्रश्न विचारायला शिकले. पण मंत्री होऊ आणि आपल्याला उत्तर द्यावे लागेल असे धनंजय मुंडेंना कधी स्वप्नातही वाटले नव्हते का? ते प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी बगल देत आहेत. असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला. 

जिल्ह्यात पुन्हा जोमाने काम करू आणि मतदारांचा विश्वास जिंकू असे पंकजा मुंडे म्हणाल्या. जशास तसे उत्तर देण्यासाठी साम, दाम, दंड वापरून लढणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी