'या' कारणांमुळे पंकजा मुंडे यांना मिळाली नाही उमेदवारी?

औरंगाबाद
अजहर शेख
Updated May 14, 2020 | 18:35 IST

पंकजा मुंडे यांच्या मागे मोठ्या प्रमाणात वंजारी समाज आहे आणि त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे तो नाराज आहे. ट्वीटर, फेसबुकवर तशा भावना दिसतातही.

Pankaja Munde did not get candidature due to these reasons?
या कारणांमुळे पंकजा मुंडे यांना मिळाली नाही उमेदवारी?  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • नाथाभाऊंना 7 वेळा आमदारकी
  • पंकजाच्या बदल्यात वंजारी उमेदवार आणि समाजाला भुरळ
  • दोन्ही कराड काही काळापूर्वी पंकजांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते

बीड: विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पंकजा मुंडे यांचा पराभव चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभा पराभव पचवताना पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची ओढ लागली होती असं म्हणावं लागेल. कारण विधान परिषदेची नाकारलेली उमेदवारी पंकजा मुंडे यांच्या फार जिव्हारी लागली आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत स्वतः स्वतःलाच सावरत आहे. असं देखील म्हटलं होतं. मात्र पंकजा मुंडेंना उमेदवारी का दिली गेली नाही? त्या मागचं राजकारण काय?
पंकजा मुंडेना उमेदवारी हवी होती का?यावर राजकीय विश्लेषकांचे काय मत आहे.चला जाणून घेऊया.

बीडच्या राजकारणातील गाडे अभ्यासक संजय मालानी यांच्या मते

दरम्यान बीड जिल्ह्यातील राजकारणाचे गाढे अभ्यासक संजय मालानी असं म्हणतात की, भारतीय जनता पार्टीत पक्षनेतृत्वाला केलेलं चॅलेंज कधीच सहन केलं जात नाही. मात्र पंकजा मुंडे यांनी सातत्याने मी पक्षापेक्षाही मोठी आहे किंवा हा पक्ष माझ्या वडिलांनी मोठा केला आहे त्यामुळे माझा कोणीही ही बॉस नाही, या भूमिकेत होत्या. त्यांची भाषणे ही त्या पद्धतीची होती किंवा असायची. तितकच खर आहे की पक्ष गोपीनाथ मुंडेंनी वाढवला. मात्र पक्षाची भूमिका ही वेगळी आहे. हा पक्ष कोण्या एकाचा नाही अशा मानसिकतेत भारतीय जनता पार्टी असते.

गोपीनाथ गडावर घेतलेली सभा

राजकीय विश्लेषकांच्या मते पंकजा मुंडे यांनी विधानसभेच्या निवडणूकीनंतर गोपीनाथ गडावरती जंगी मोठीं सभा घेतली होती. त्या सभेत एकनाथ खडसे देखील हजर होते. त्या सभेतून पक्षाच्या नेतृत्वावर केलेली टीका व त्यानंतर भारतीय जनता पार्टी योगी गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने दिलेला इशारा.

बीजेपीची पॉलिसी

संजय मालानी म्हणतात की, जे कोणी लोकांमधील चेहरे आहेत. एकंदरीत ओबीसी चेहरे त्यांना बाजूला करायचं आणि त्यांच्या ऐवजी दुसरे चेहरे द्यायचे तेही ओबीसी चेहेरेच! जेणेकरून समाजाला सांगताना अस सांगायचं की आम्ही समाजावर अन्याय नाही केला.पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर आमदारकी दिली गेली असती तर त्या पुन्हा सक्रिय झाल्या असत्या. त्यामुळे त्यांना तिकीट नाकारले गेले असावे असं मत संजय मालानी यांनी व्यक्त केलं आहे.

पंकजाच्या बदल्यात वंजारी उमेदवार आणि समाजाला भुरळ

पंकजा मुंडे यांच्या मागे मोठ्या प्रमाणात वंजारी समाज आहे आणि त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे तो नाराज आहे. ट्वीटर, फेसबुकवर तशा भावना दिसतातही. त्यामुळे कराडांना उमेदवारी देऊन पक्ष समाजावर अन्याय करीत नाही, हा संदेश पक्ष देऊ पाहतोय. त्याचसाठी डाॅ. भागवत कराड यांनाही पक्षाने राज्यसभेवर घेतले आहे. हे दोन्ही कराड काही काळापूर्वी पंकजांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. पंकजा यांच्या मागे उभे राहून नाही तर पक्षाबरोबर (म्हणजे आता जे पक्षाचे कर्तेधर्ते आहेत त्यांच्याबरोबर) राहूनच तुम्हाला पुढे जाता येेईल, हा संदेश त्यातून पक्षाने पंकजा समर्थकांना दिला आहे. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पार्टी विधानसभेला तिकीट दिल्यानंतर परत विधानपरिषदेच तिकीट दिलं जात नाही, त्यामुळे कदाचित पंकजा मुंडे यांना केंद्राने तिकीट दिलं नसावं, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या दिग्गज नेत्यांना विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्याच्या कारणांवर चंद्रकांत पाटलांनी म्हणाले, ‘पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत परळीमध्ये पराभव झाला. विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर परत विधानपरिषदेला तिकीट दिलं जात नाही. त्यामुळे कदाचित पंकजा मुंडे यांना केंद्राने उमेदवारी दिली नसावी. मी स्वत: पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्यासाठी प्रयत्नशील होतो.

 पंकजा गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत वाढलेल्या कार्यकर्त्या

दरम्यान पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या मुशीत वाढलेल्या कार्यकर्त्या असून त्यांच्यामध्ये नाराजी असू शकते, पण पंकजाताई खूप मॅच्युअर आहेत. त्यांना खूप मोठं करिअर आहे. त्या चुकीचा निर्णय घेत नाहीत. त्या स्वत: स्वत:ला समजावतील, असा पुनरुच्चार चंद्रकांत पाटील यांनी केला. कोरोनातून सूट मिळाली तर सर्वांची भेट घेईन, पंकजाताई तर मुंबईतच आहेत, त्यांच्याशी फोनवरुन बोलेन, असं पाटील देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

नाथाभाऊंना 7 वेळा आमदारकी

नाथाभाऊंना 7 वेळा आमदारकी, सुनेला खासदारकी दिली, मुलीला तिकीट दिलं. केंद्राकडे आम्ही पाठपुरावा केला, नाथाभाऊंवर खुन्नस काढण्याचा हेतू नाही, अशा शब्दात एकनाथ खडसेंना आणि काय हवं? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. कारवाई करणं ही आमची कार्यपद्धती नाही, हाताला जखम झाली, तर हात नाही काढत, मलम लावता, पट्टी लावता, इंजक्शन देता, अतिशय वेदना झाल्यानंतर हात कापतात, तेव्हा आनंद होत नाही, त्यामुळे नाथाभाऊ शंभरवेळा बोलले तर आम्ही कारवाई करणार नाही, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी