पंकजा मुंडे भेटल्या 'या' नेत्याला, या पक्षात जाणार चर्चांना उधाण

औरंगाबाद
Updated Dec 02, 2019 | 16:51 IST | अजहर शेख

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या भाजपमध्ये खूश नसल्याचे सध्यातरी दिसत आहे, दोन दिवसापूर्वी त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून भावनिक पोस्ट टाकली होती.

pankaja munde leave bjp join shiv sena speculation gopinath munde uddhav thackeray
पंकजा मुंडे भेटल्या 'या' नेत्याला, या पक्षात जाणार चर्चांना उधाण 

बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या भाजपमध्ये खूश नसल्याचे सध्यातरी दिसत आहे, दोन दिवसापूर्वी त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून भावनिक पोस्ट टाकली होती. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांना १२ डिसेंबरला भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधून मोठा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. १२ तारखेला गोपीनाथ मुंडे यांचा जन्मदिवस आहे, याच दिवशी पंकजा मुंडे यांनी मोठी रॅली काढणार आहेत. यात आपल्या समर्थकांना या रॅलीमध्ये येण्यासाठी देखील सांगितलं आहे. रॅलीनंतर पंकजा मुंडे आपल्या कार्यकर्त्यांसमोर एक मोठा निर्णय घेणार असल्याचे देखील माहिती समोर येत आहे. आता पंकजा मुंडे कुठला निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचं आणि भारतीय जनता पक्षाचे देखील लक्ष असणार आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. 

पंकजा मुंडे यांना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.  त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. 
 
या निवडणुकीत पंकजा मुंडेसाठी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांच्या मतदारसंघांमध्ये रॅली केली होती. पंकजा मुंडे यांच्या फेसबूक पोस्टनंतर भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमावे यासाठी पंकजा मुंडे यांनी हे भावनिक आवाहन केले आहेत. त्या आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आहेत. त्यामुळे त्या नाराज आहे, किंवा त्या शिवसेनेत जाणार आहेत. असा अर्थ या फेसबूक पोस्टचा होत नाही. परंतु ,पंकजा मुंडे यांचं भाजपामध्ये सध्या अलबेल दिसत नाही हे मात्र तितकंच खरं. आणि आज त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून भाजपा शब्द हटवला त्यामुळे पंकजा मुंडे या भाजप सोडणार का? हा देखील प्रश्न आता समोर येतोय. 

दरम्यान, त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबूक अकाउंटवरून भाजप हा शब्द हटविल्याबाबत अजूनही भाजपच्या नेत्यांकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही. पण या पोस्ट नंतर भाजपच्या नेत्यांची चांगली पळापळ झाली आहे.  त्यामुळे १२ डिसेंबरला पंकजा मुंडे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

पंकजा मुंडे यांची मतदार संघातील वचक कमी

आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी दारुण पराभव केला त्यामुळे त्यांची मतदारसंघावर असणारी  पकड आता सुटत चाललेली दिसते. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा वाढता प्रभाव यामुळे पंकजा मुंडे यांची वचक हवा तसा राहिलेला नाही . त्यामुळे पंकजा मुंडे यांचे राजकीय भवितव्य देखील धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.

पंकजा शिवसेनेत जाणार?

भाजपा सोडल्यानंतर पंकजा मुंडे  शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा समोर येत आहे. सत्तास्थापनेनंतर पंकजा आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.  पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांना देखील भेटून चर्चा केल्याचं वृत्त सूत्राद्वारे समोर येत आहे. जर पंकजा मुंडे यांनी भाजप सोडली तर त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी शिवसेना हाच सक्षम पर्याय समोर असू शकतो. असे मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत. 

दरम्यान, पंकजा मुंडे म्हणा किंवा मुंडे-महाजन कुटुंबियांचा आणि ठाकरे कुटुंबियांशी अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहे. काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी  गेल्या होत्या. तसेच त्यांचे राज ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहेत. यावर बोलताना माजी मंत्री विनोद तावडे म्हणाले, की ठाकरे कुटुंबाचे मुंडे आणि महाजन कुटुंबाशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे लगेच त्या नाराज आहेत आणि शिवसेनेत जातील असा काही त्याचा अर्थ होत नाही. मी त्यांच्याशी वैयक्तिक बोललो आहे. त्यांचा असा काही विचार नाही.  परंतु १२ तारखेच्या त्यांच्या निर्णयावर सर्व लोकांचं लक्ष लागले आहे .

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी