पंकजा मुंडेंचं मोठ वक्तव्य, म्हणाल्या या सरकारचं भवितव्य....

pankaja munde targeted mahavikasaghadi goverment and dhananjay munde : अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये आनंद आहे. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यामुळे बरं वाटायला लागलं आहे, असं म्हणत म्हणत महाविकास आघाडीचे कबाड निघणार आहे, अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी केली

pankaja munde targeted mahavikasaghadi goverment and dhananjay munde
पंकजा मुंडेंचं मोठ वक्तव्य, म्हणाल्या या सरकारचं भवितव्य....  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही.
  • सगळ्याना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का? – पंकजा मुंडे
  • धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणातच स्टेटमेंट नाही – मुंडे

बीड : महाविकासआघाडी सत्तेत जास्त दिवस टिकणार नाही असं वक्तव्य अनेकवेळा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं होत. दरम्यान , भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील यावर भकित वर्तवलं आहे.  या सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे' असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारला (mva government) दोन वर्ष पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते सरकार पडण्याबद्दल भाकित वर्तवत आहे. परंतु , याविषयी पहिल्यांदा पंकजा मुंडे यांनी सरकारबद्दल भाकित वर्तवलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये आनंद आहे. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यामुळे बरं वाटायला लागलं आहे, असं म्हणत म्हणत महाविकास आघाडीचे कबाड निघणार आहे, अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी केली. 'महाविकास आघाडी सरकारचं भविष्य फार काही चांगलं नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे, त्याची सुरुवात नगर पंचायत निवडणुकीच्या विजयापासून होईल' असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सत्ता बदलाचे संकेत पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणातून दिले आहेत. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील जाहीर सभेत बोलत त्या होत्या.

सगळ्याना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का? – पंकजा मुंडे

सगळं माझ्याच गळ्यात आले पाहिजे. हे आमदार आणि पालकमंत्री यांचं सुरू आहे. याला जेलमध्ये घालू त्याला जेल मध्ये घालू सगळ्याना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का? कुणाचं घर बरबाद करायचं असं राजकारण मुंडे साहेबांनी शिकवलं नाही, असं म्हणत पंकजा मुंडें यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचार सभेत १०० कोटी ची घोषणा केली पाच नगरपंचायतला ५००  कोटी आणणार असं विधान धनंजय मुंडे यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केलं होतं. या विधानाचा पंकजा मुंडे यांनी समाचार घेत जोरदार पलटवार केला. 

धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणातच स्टेटमेंट नाही – मुंडे

आरक्षण द्या नाहीतर नका देऊ आमची दुकानं चालली पाहिजे, त्याचबरोबर 'धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणतेच स्टेटमेंट नाही, कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात. असं देखील त्यांनी म्हटल आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी