'लहान माझी बाहुली तिची मोठी सावली...' बहिणीच्या वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडेंचं खास ट्विट

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 17, 2021 | 16:31 IST

pankja munde tweet on sister pritam munde birthaday : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे या भाजपच्या तिकिटावर निवडणुकीत उभा होत्या. प्रितम मुंडे यांच्या  विरोधात राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे हे रिंगणात होते

pankja munde tweet on sister pritam munde birthaday
बहिणीच्या वाढदिनी पंकजा मुंडेंनी केलं खास ट्विट  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांचा प्रीतम मुंडेंनी केला होता पराभव
  • पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातही पंकजा मुंडे यांनी केलं ट्विट
  • प्लोरीतम मुंडे यांचे लोकसभेत केलेले भाषण चांगलंच गाजलं होतं

मुंबई: भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (ex minister pankaja munde) यांनी बहीण आणि बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे (mp pritam munde) यांच्या वाढदिवसानिम्मित (pritam munde birthaday) एक खास ट्विट केलं आहे. पंकजा मुंडे यांनी केलेल्या आपल्या ट्विटमध्ये प्रितम मुंडे यांना आशीर्वाद देत प्रितम तू नेहमी सुखी रहा असं म्हटलं आहे. प्रितम मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. गोपीनाथ मुंडे (gopinath munde) यांच्या निधनानंतर प्रितम मुंडे या राजकारणात सक्रीय झाल्या असून, राजकारणासोबत सामाजिक कामातही त्या सहभाग घेत असतात.

नेमकं काय केलं आहे पंकजा मुंडे यांनी ट्विट?

लहान माझी बाहुली तिची मोठी सावली...इतकी एकरूप की जणू सावली... वाढदिवसाचे खूप आशिर्वाद प्रितम तू नेहमी सुखी रहा. या शब्दांमध्ये पंकजा मुंडें यांनी प्रितम मुंडेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणे यांचा प्रितम मुंडेंनी केला होता पराभव

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रितम मुंडे या भाजपच्या तिकिटावर निवडणुकीत उभा होत्या. प्रितम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे हे उमेदवार रिंगणात होते. तर, वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूकीच्या रिंगणात होते. दरम्यान, २०२९ च्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात झाली असल्याचे पाहायला मिळाले. अखेर प्रितम मुंडे यांनी राष्ट्रवादीचे  उमेदवार बजरंग सोनावणे यांचा १ लाख ७८ हजार ९२० मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता.

प्लोरीतम मुंडे यांचे लोकसभेत केलेले भाषण चांगलंच गाजलं होतं

प्रितम मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत केले भाषण चांगलंच गाजलं होतं. प्रितम मुंडे या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा समर्थपणे सांभाळत असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातून बीड लोकसभेतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये प्रितम मुंडे या नेहमी राज्याच्या विकासाचे प्रश्न मांडताना दिसतात.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी