rajesh tope comment on vaccination : ...म्हणून लस घेण्यास टाळाटाळ सुरू आहे!

people are reluctant to get vaccinated because vaccination is optional says rajesh tope : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना संकटावर चर्चा केली. या चर्चेला महाराष्ट्रातून मुख्यमंत्र्यांऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. यावेळी लसीकरण या विषयावर टोपे यांनी राज्याच्यावतीने महत्त्वाचे मुद्दे मांडले.

people are reluctant to get vaccinated because vaccination is optional says rajesh tope
...म्हणून लस घेण्यास टाळाटाळ सुरू आहे! 
थोडं पण कामाचं
  • ...म्हणून लस घेण्यास टाळाटाळ सुरू आहे!
  • आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती
  • आरोग्य सुविधा आणखी मजबूत करा आणि लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी राज्यांना दिल्या

people are reluctant to get vaccinated because vaccination is optional says rajesh tope : जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोरोना संकटावर चर्चा केली. या चर्चेला महाराष्ट्रातून मुख्यमंत्र्यांऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. चर्चेदरम्यान लॉकडाऊन संदर्भात पंतप्रधान काहीही म्हणाले नाही.मात्र लॉकडाऊन लावताना समान नियम निकष हवे अशी मागणी पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याच्यावतीने केल्याचे टोपे यांनी सांगितले. 

लसीकरण ऐच्छिक आहे. महाराष्ट्रात ९८ लाख नागरिकांनी अद्याप लसचा पहिला डोस घेतलेला नाही. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कायदेशीर तरतूद करता येईल का याबाबत केंद्राकडे लेखी मागणी केल्याचे टोपे म्हणाले. आरोग्य सुविधा आणखी मजबूत करा आणि लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचना पंतप्रधान मोदी यांनी राज्यांना दिल्या आहेत; अशी माहिती टोपे यांनी दिली.

मी माळकरी आहे आणि कोरोनाची तिसरी लाट ही माळा काढणाऱ्यांसाठी आहे असे किर्तनकार इंदुरीकर महाराज म्हणाले. पण हे वक्तव्य सकारात्मक दृष्टीने घ्यावं. ते शाकाहारी आहेत आणि शाकाहारींना प्रोत्साहन देण्यासाठी केले असावे; असे सांगत टोपे यांनी इंदुरीकर महाराजांच्या विषयावर जास्त बोलणे टाळले. 

ECRP 2 चा निधी वेगाने खर्च करण्यासाठी काही अटी बदलणे आवश्यक आहे तसेच  लस आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल संदर्भात  आणखी स्पष्टता हवी असे टोपे म्हणाले पण याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही. काही जण घरातच कोरोना चाचणी करतात आणि ती पॉझिटिव्ह आली तरी उपचार घेणे टाळतात. यावर उपाय म्हणून घरी कोरोना चाचणी करण्याची किट विकणाऱ्यांनी ग्राहकांची माहिती प्रशासनाला द्यावी याकरिता एखादी कायदेशीर तरतूद पूर्ण देशासाठी केंद्राने करावी; अशी मागणी केल्याचे टोपे म्हणाले. 

मुंबईत १५ ते १८ वयोगटातील मुलांचे १२ टक्के लसीकरण झाले. तर संपूर्ण राज्यात याच वयोगटाचे ४० टक्के लसीकरण झाले आहे. आणखी पंधरा दिवसांत राज्यातील १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण होईल; असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला. 

केंद्राकडून राज्याला नियमित लसच्या डोसचा पुरवठा सुरू आहे. मिळालेल्या लसचे राज्यात जिल्हानिहाय वाटप सुरू आहे. सध्या राज्याकडे लसचे साडेसहा लाख डोस आहेत हे डोस आणखी दोन-तीन दिवस पुरतील; असे टोपे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी