चंद्रकांत खैरेंच्या भाषणाकडे लोकांनी फिरवली पाठ, भाषणाला खैरे उभे राहताचं सोडल्या खुर्च्या

औरंगाबाद
Updated Nov 19, 2022 | 11:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chandrakant Khair did not get a chance to speak in the Mahaprabodhan Yatra ; उद्धव ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा सुरु असून, या यात्रेत सुषमा अंधारे यांनी जोरदार भाषण केले. अंधारे यांच्या भाषणानंतर चंद्रकांत खरे हे भाषणाला उभारले असता लोक निघून चालले. लोकं निघून जात असल्याचे पाहून चंद्रकांत खैरे यांनी नतमस्तक होत सगळ्यांचे आभार मानले.

Chandrakant Khair did not get a chance to speak in the Mahaprabodhan Yatra
चंद्रकांत खैरेंच्या भाषणाकडे लोकांनी फिरवली पाठ, उभे राहताचं सोडल्या खुर्च्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चंद्रकांत खैरे यांना काल भाषणाची संधी न मिळाल्याने मोठ्या चर्चा रंगू लागल्या
  • सुषमा अंधारे यांच्या भाषणानंतर लोकांनी सोडल्या खुर्च्या
  • लोकं निघून जात असल्याचे पाहून चंद्रकांत खैरे यांनी नतमस्तक होत मानले आभार

औरंगाबाद : उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे आपल्या भाषणात सतत एकनाथ शिंदे गटावर (Eknath shinde) जोरदार टीका करत असतात. परंतु काल चंद्रकांत खैरे यांना काल भाषणाची संधी न मिळाल्याने मोठ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवसेनेतून शिंदे गट हा वेगळा झाल्यावर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून राज्यातील प्रत्येक भागात दौरे करून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्याचे काम करत आहे. अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात दाखल झाले असले तरी चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले आहेत. दरम्यान खैरे हे औरंगाबाद विभागाचे नेतृत्व करतात. मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार प्रहार करण्यात येत आहे. 

अधिक वाचा ; इलॉन मस्क बोलतच राहिले आणि कर्मचाऱ्यांनी सोडल्या नोकऱ्या

खैरे भाषणाला उभारताच लोक निघाल्याने नतमस्तक होत खैरेंनी सर्वांचे आभार मानले

उद्धव ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा सुरु असून, या यात्रेत सुषमा अंधारे यांनी जोरदार भाषण केले. अंधारे यांच्या भाषणानंतर चंद्रकांत खरे हे भाषणाला उभे राहिले असता लोक निघून जाऊ लागले. लोकं निघून जात असल्याचे पाहून चंद्रकांत खैरे यांनी नतमस्तक होत सगळ्यांचे आभार मानले. भाषण सुरू करण्याअगोदरच सभेतील लोक खुर्च्यांवरून उठले त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना भाषण करण्याची संधीच मिळाली नाही. यावर खैरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, जनता आमच्या पाठीशी उभी राहिली आणि एवढा वेळ झाला तरी आमच्यासाठी थांबले यासाठी नतमस्तक होऊन जनतेचे आभार मानले असे मत व्यक्त केले.

अधिक वाचा ; Rip Twitter: मस्कला झालंय तर काय? शेअर केली ट्विटरची कबर 

सुषमा अंधारे यांचे भाषण संपतात नागरिकांनी खुर्च्या सोडल्या

दरम्यान, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना महाप्रबोधन यात्रेत सभेत बोलण्याची संधीच मिळाली नाही. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे भाषण संपतात नागरिकांनी खुर्च्या सोडल्या. त्यामुळे भाषणासाठी उठलेल्या खैरे यांना जनतेसमोर नतमस्तक व्हावे लागले. दरम्यान, खैरे यांना भाषणाची संधी न मिळाल्याची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सुरु आहे.

अधिक वाचा ; मत मांडा ! Data Protection Billवर सरकारला हव्यात प्रतिक्रिया

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी