उस्मानाबादचा एक आमदार नॉट रिचेबल, दोन्हीही नंबर बंद

Phone of a Shiv Sena MLA from Osmanabad district is off : शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज आमदार ज्ञानराज चौगुले हे गेली 3 टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्री पद न मिळाल्याने चौगुले हे नाराज होते तर त्यांना नेहमी डावलन्यात आले असल्याचे नेहमी दिसलें आहे.

Phone of a Shiv Sena MLA from Osmanabad district is off
उस्मानाबादचा एक आमदार नॉट रिचेबल, दोन्हीही नंबर बंद   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल झाले आहेत
  • आमदार ज्ञानराज चौगुले हे एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळखले जातात
  • एकनाथ शिंदे १३ आमदार घेऊन नॉट रिचेबल झाले आहेत

उस्मानाबाद : सलग ३ वेळा निवडणून आलेले उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल झाले आहेत. आमदार ज्ञानराज चौगुले हे उमरगा, लोहाराचे आमदार आहेत. चौगुले हे नॉट रिचेबल झाले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आमदार ज्ञानराज चौगुले हे अनेक दिवसांपासून नाराज असल्याची देखील माहिती आहे.

अधिक वाचा : सुरतेतील झटक्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप होणार?

आमदार ज्ञानराज चौगुले हे एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळखले जातात

शिवसेनेचे उमरगा लोहारा आमदार ज्ञानराज आमदार ज्ञानराज चौगुले हे गेली 3 टर्म सलग सेनेचे आमदार असून ते एकनाथ शिंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. सलग 3 वेळा आमदार असतानाही मंत्री पद न मिळाल्याने चौगुले हे नाराज होते तर त्यांना नेहमी डावलन्यात आले असल्याचे नेहमी दिसलें आहे. चौगुले यांचे दोन्ही नंबर बंद असून ते काल पासून इतर आमदार यांच्या संपर्क बाहेर आहेत.

अधिक वाचा : योग पार्ट ऑफ लाइफ नाही, वे ऑफ लाइफ बनत आहे-पंतप्रधान मोदी 

आमदार डॉ तानाजीराव सावंत याचा ही फोन बंद आहे

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आमदार चौगुले हे संपर्काबाहेर असल्याने ते एकनाथ शिंदे सोबत आहेत की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. शिवसेनेचे उपनेते तथा आमदार डॉ तानाजीराव सावंत याचा ही फोन बंद आहे, नुकतेचे सावंत यांनी घरी बसेल पण शिवसेना सोडणार नाही असे वक्तव्य शिवसेनेच्या शिवसपर्क अभियान दरम्यान केले होते.

अधिक वाचा : मंगळवार २१ जून २०२२; काय वाढून ठेवलं आहे तुमच्या राशीत जाणून

एकनाथ शिंदे १३ आमदार घेऊन नॉट रिचेबल झाले आहेत

 विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहाव्या उमेदवाराला दगाफटका झाल्यानंतर शिवसेनेचे १३ आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. शिवसेना पक्षातील अंतर्गत धुसफूस या निमित्ताने जाहीरपणे चव्हाट्यावर येत असल्याची चर्चा आहे. नॉट रिचेबल असणारे सर्व आमदार हे एकनाथ शिंदे समर्थक असल्याचंही समजतं आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे यांच्यातील धुसफूसही मोठं स्वरूप घेत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

अशी समजली बातमी

विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले. मात्र काँग्रेसचा उमेदवार पडला. काँग्रेसच्या काही मतांसोबतच शिवसेनेचीही मतं फुटल्याचं दिसून आलं. यासंदर्भात मध्यरात्री वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे १३ आमदार गैरहजर असल्याचं लक्षात आलं. हे सर्व आमदार अद्यापही नॉट रिचेबल असल्याची माहिती असून ते कुठे आहेत, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी